KBC 15 शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही ७ कोटी; या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 15 : बिग बीं यांचा (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती १५’ (Kaun Banega Crorepati 15) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामामधील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने १ कोटी रुपये जिंकल्याची माहिती समोर आली […]

KBC 15

KBC 15

KBC 15 : बिग बीं यांचा (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती १५’ (Kaun Banega Crorepati 15) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामामधील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने १ कोटी रुपये जिंकल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता तो ७ कोटी रुपये जिंकणार की नाही याचं उत्तर देखील समोर आलं आहे.


पंजाबचा (Punjab) जसकरण ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळं तो पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. १ कोटी जिंकल्यावर खुद्द बिग बीं यांनी त्याचं अभिनंदंन केल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता न आल्याने जसकरणने खेळ सोडून जायचा निर्णय हाती घेतल्याचं समोर आले आहे.

“पद्म पुराणानुसार हरणाच्या शापामुळे कोणत्या राजाला १०० वर्षं वाघ बनून रहावं लागलं आहे?” हा ७ कोटींचा प्रश्न जसकरणसमोर ठेवण्यात आला होता. यासाठी पर्याय होते, १.क्षेमधूर्ति २.धर्मदत्त ३.मितध्वज ४.प्रभंजन. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं प्रभंजन. परंतु जसकरणला या प्रश्नाचं उत्तर आले नसल्याने त्याला हा खेळ सोडून द्यायचा लागला आहे.

Wedding ठरलं! ‘या’ दिवशी परिणीती होणार ‘मिसेस चड्डा’; राजस्थानमध्ये शुभमंगल सावधान पडणार पार

१ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणने लाईफ लाइनच्या मदतीने दिल्याचे बघायला मिळाले. परंतु पुढील या कठीण सवालाचे उत्तर त्याला आजिबात देता आले नाही. जसकरणने खेळ सोडल्याने अनेक प्रेक्षकवर्ग निराश झाल्याचे बघायला मिळत आहे. त्याने ज्या पद्धतीने एवढा मोठा टप्पा पार केला ते बघता तो नक्कीच या प्रश्नांची उत्तर देणार असं चाहत्यांना वाटलं होतं. बिग बीं यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. जसकरणचा हा भाग ४ व ५ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित झाला आहे.

Exit mobile version