Praveen Dabas Car Accident: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता प्रवीण डबास (Praveen Dabas) यांच्याशी संबंधित धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Praveen Dabas Car Accident) आज सकाळी अभिनेता कार अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर 50 वर्षीय प्रवीण डबास यांना मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण डबास यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. अपघाताच्या वेळी प्रवीण डबास स्वत: कार चालवत होते, आज सकाळी अपघात झाला, याची माहिती सध्यातरी प्रवीणची पत्नी प्रीती झांगियानीने दिले आहे. होलीक्रॉस रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही.
प्रीती झांगियानी यांनी निवेदन जारी
प्रवीण डबास यांची पत्नी प्रीती झिंगियानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या अपघातानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला यावेळी मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय अपडेटनुसार, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे आणखी नुकसान झाले आहे का, तो या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही (अपघातापूर्वी) त्याच्या कामाच्या ओझ्यामुळे पहाटे गाडी चालवताना तो कार अपघाताचा बळी ठरला आहे.
प्रवीण डबास चित्रपट
प्रवीणने दिल्लगी, मान्सून वेडिंग, खोसला का घोंसला, द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, मैने गांधी को नही मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदू सरकार, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. प्रवीणने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, पण अभिनेता म्हणून त्याला विशेष यश मिळाले नाही. अलीकडेच तो थेट ओटीटी ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘शर्मा जी की बेटी’ चित्रपटातही दिसला होता. 2011 मध्ये त्यांनी ‘सही बंदे, गलात धांधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते, 2020 मध्ये प्रवीण डबास यांनी भारतात प्रो-पंजा लीग स्पर्धाही लाँच केली आणि लाँचिंग प्रसंगी, क्रीडा मंत्री किरण रिजुजू आणि बॉक्सर विजेंदर. सिंग आदी उपस्थित होते.
Pune Car Accident: पोलिसांकडं भक्कम पुरावे; जूनअखेर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
प्रीती झांगियानी करिअर
प्रवीणची पत्नी प्रीती झांगियानी हिने आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बतें’ (2008) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 2008 मध्ये प्रवीणसोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत.