The Archies : लव, फ्रेंडशिप अन् ब्रेकअप; ‘द आर्चीज’चा धमाकेदार टीझर रिलीज!

The Archies Teaser: झोया अख्तर दिग्दर्शित व रीमा कागदी निर्मित ‘द आर्चीज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (The Archies Teaser) स्टारकिड्सच्या या सिनेमाचे टीझर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर (social media) ‘द आर्चीज’ चा ट्रेलर व्हायरल होत आहे.   View this post on Instagram   A post shared by Suhana Khan […]

The Archies

The Archies

The Archies Teaser: झोया अख्तर दिग्दर्शित व रीमा कागदी निर्मित ‘द आर्चीज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (The Archies Teaser) स्टारकिड्सच्या या सिनेमाचे टीझर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर (social media) ‘द आर्चीज’ चा ट्रेलर व्हायरल होत आहे.


किंग खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) व श्रीदेवीची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात 60 दशक दाखवण्यात आलं आहे. लव, फ्रेंडशिप अन् ब्रेकअप अशा अनेक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येणार आहे. हा सिनेमा अमेरिकन कादंबरी ‘द आर्चीज’ यावर आधारित असून सुहाना खान आणि खुशी कपूर सोबतच बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहीर आहूजा, वेदांग रैना, आदिती डॉट आणि युवराज मेंडा या कलाकारांचा समावेश आहे.

सुहानाने या सिनेमाचा टीजर शेअर करत प्रेक्षकांना विचारला आहे की, ‘पुन्हा त्या काळात जायला तुम्ही तयार आहात का? ‘द आर्चीज’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज’. सुहानाच्या या पोस्टवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत सिनेमाची उत्सुकता असल्याच सांगितल आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

‘द आर्चीज’चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘द आर्चीज’ सिनेमाच्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, असे सर्वांना वाटत होते. हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा करत सांगितले आहे. ‘द आर्चीज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version