गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देणं हॉलिवूड अभिनेत्रीला पडलं महागात, भडकले नेटकरी, डिलिट केला फोटो

Kim Kardashian: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी हॉलिवूड सोशलाइट किम कार्दशियन (Kim Kardashian ) मुंबईत आली.

गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देणं हॉलिवूड अभिनेत्रीला पडलं महागात, भडकले नेटकरी, डिलिट केला फोटो

गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देणं हॉलिवूड अभिनेत्रीला पडलं महागात, भडकले नेटकरी, डिलिट केला फोटो

Kim Kardashian Trolled: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Ambani Wedding) यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी हॉलिवूड (Hollywood) सोशलाइट किम कार्दशियन (Kim Kardashian ) मुंबईत आली होती. किमने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर या लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो गणेशा मूर्तीसोबतही क्लिक करण्यात आली आहेत. देवाच्या मूर्तीसोबत पोज देतानाचा फोटो लोकांना आवडले नाही आणि म्हणून तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला. मात्र, किमला तिची चूक लक्षात येताच तिने हे फोटो डिलीट केले.


डिलीट केलेल्या एका फोटोमध्ये किम गणपतीच्या मूर्तीसोबत पोज देताना दिसली, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून पोज दिली. हा दुसरा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स चांगलेच संतापले. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने थेट मुकेश अंबानींना टॅग केले आणि म्हटले, तुमच्या पाहुण्यांना काही शिष्टाचार शिकवा.

तसेच, काही लोकांनी या फोटोंच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये किमला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ती ज्या व्यक्तीसोबत पोज देत आहे ती शोपीस किंवा प्रॉप नाही तर हिंदू भगवान गणेशाची मूर्ती आहे. काही काळानंतर जेव्हा हे ट्रोलिंग वाढू लागले तेव्हा किमच्या टीमने हे फोटो लगेच डिलीट केले.

Tabu: अभिनेत्रीची अमेरिकन टीव्ही मालिकेमध्ये एण्ट्री, मिळाला हा मोठा प्रोजेक्ट

डॅमेज कंट्रोल कसे होते ते जाणून घ्या

फोटो हटवल्यानंतर, या प्रकरणाबाबत किम कार्दशियन किंवा तिच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. पण डॅमेज कंट्रोल म्हणून तिच्या भारतीय चाहत्यांना खूश करण्यासाठी किमने लगेच इस्कॉन मंदिराचे काही फोटो शेअर केले. अमेरिकेला जाण्यापूर्वी, किम आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन यांनी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Exit mobile version