Paramveer Cheema : TVF (द व्हायरल फीव्हर) आजच्या काळातील भारतातील सर्वात प्रभावी कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. सातत्याने दर्जेदार, मनोरंजक आणि रिलेटेबल कंटेंट देत TVF ने प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली आहे. कंटेंट ही त्यांची मोठी ताकद असली, तरी TVF ने अनेक उत्कृष्ट कलाकारही घडवले आहेत, जे आज एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत मोठी मजल मारत आहेत. गेल्या दशकात TVF हे भारतातील सर्वात प्रभावी लॉन्चिंग पॅडपैकी एक ठरले आहे.चला तर मग, गेल्या 10 वर्षांत TVF मधून पुढे आलेल्या काही टॅलेंट्सवर नजर टाकूया:
परमवीर चीमा
परमवीर चीमा हा अत्यंत प्रतिभावान अभिनेता आहे. TVF च्या सपने Vs एवरीवन मधील महत्त्वाच्या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या नजरेत आला. TVF मुळे त्याला मोठी ओळख मिळाली आणि आज तेरे इश्क़ में व बॉर्डर 2 सारख्या प्रोजेक्ट्समुळे तो यशाचा काळ अनुभवतो आहे. त्याची अभिनयातील वाढ आणि जर्नी खरंच कौतुकास्पद आहे.
जितेंद्र कुमार
आपले लाडके ‘जीतू भैय्या’ किंवा ‘सचिव जी’ जितेंद्र कुमार हा खर्या अर्थाने अपवादात्मक टॅलेंट आहे. TVF पिचर्स, कोटा फॅक्टरी आणि पंचायतमधील अभिषेक त्रिपाठी या भूमिकांमुळे त्याने प्रचंड फॅन फॉलोइंग मिळवली. पुढे शुभ मंगल ज़्यादा सावधान, जादूगर आणि ड्राय डेसारख्या चित्रपटांमधून त्याने सिनेमातही ठसा उमटवला. आज TVF मुळे तो घराघरात ओळखला जाणारा चेहरा असून त्याच्या नावावर अनेक Filmfare OTT पुरस्कार आहेत.
नवीन कस्तुरिया
नवीन कस्तुरियाची TVF सोबतची जर्नी दीर्घ आणि दमदार आहे. TVF पिचर्स, बोस: डेड/अलाइव, हॅपिली एव्हर आफ्टर, अॅस्पिरंट्स आणि ब्रीद: इंटू द शॅडोज यांसारख्या प्रोजेक्ट्समधून त्याने आपली लोकप्रियता सिद्ध केली. सुलेमानी कीडा (2014) आणि वाह जिंदगी (2019) या चित्रपटांमध्येही त्याचे काम लक्षवेधी ठरले आहे.
सुमीत व्यास
TVF मधून पुढे आलेला आणखी एक दमदार अभिनेता म्हणजे सुमीत व्यास. परमनंट रूममेट्स आणि TVF ट्रिपलिंगमुळे त्याला प्रचंड ओळख मिळाली. पुढे इंग्लिश विंग्लिश, पार्च्ड, गुड्डू की गन, वीरे दी वेडिंग यांसारख्या चित्रपटांमधून त्याची उपस्थिती अधिक ठसठशीत झाली.
अमोल पराशर
अमोल पराशरला TVF मुळे मोठा ब्रेक मिळाला. TVF ट्रिपलिंगमधील चितवन शर्माच्या भूमिकेमुळे तो विशेष लोकप्रिय झाला. वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये त्याने आपली बहुविध अभिनय क्षमता दाखवली. सरदार उधममध्ये भगतसिंगची भूमिका साकारत त्याने स्वतःला आणखी भक्कम सिद्ध केले.
विक्रम सिंह चौहान
सेना गार्डियन्स ऑफ द नेशनमध्ये झळकलेला विक्रम सिंह चौहान टीव्ही, वेब आणि चित्रपटांमध्ये सातत्याने दमदार काम करत आहे. ना दिल से दूर, एक दीवाना था आणि ये जादू है जिन्न का या मालिकांतील भूमिकांसाठी तो विशेष ओळखला जातो.
आशीष वर्मा
कोर्ट कचहरी, इनमेट्ससह अनेक TVF शोजमध्ये काम करणाऱ्या आशीष वर्माने आपल्या अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. अतरंगी रे, हेल्मेट, भावेश जोशी सुपरहीरो, आर्टिकल 15 आणि सुई धागा यांसारख्या चित्रपटांमधून त्याची वर्सेटिलिटी दिसून आली.
गजराज राव
गजराज राव अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असले तरी TVF च्या कंटेंटमुळे त्यांना व्यापक ओळख मिळाली. A Day With RD Sharma, F.A.T.H.E.R.S, TVF ट्रिपलिंग सीझन 2मधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पुढे बधाई होसाठी त्यांना Filmfare बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर अवॉर्डही मिळाला.
रंजन राज
कोटा फॅक्टरीमधील ‘मीना’ या भूमिकेमुळे रंजन राज लोकप्रिय झाला. त्यानंतर छिछोरे, होस्टल डेज, बाला, ड्रीम गर्ल 2 यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये त्याचे काम कौतुकास्पद ठरले.
आदर्श गौरव
होस्टल डेजमधून TVF सोबत काम करणाऱ्या आदर्श गौरवने द व्हाइट टायगरमध्ये मुख्य भूमिका साकारत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं. या भूमिकेसाठी त्याला BAFTA बेस्ट लीडिंग अॅक्टर अवॉर्डही मिळाला.
Neil Bhatt : स्टार प्लसच्या ‘या’ मालिकेत दुहेरी भूमिका साकारणार अभिनेता नील भट्ट-
चंदन रॉय
TVF च्या पंचायतमधील विकास या भूमिकेमुळे चंदन रॉयला मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय चूना, शहर लखोट, गुलमोहर आणि सनक यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही तो दिसला आहे. TVF ची ही जर्नी केवळ कंटेंटची नाही, तर टॅलेंट घडवण्याचीही आहे आणि म्हणूनच TVF आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे.
