Download App

Manmohan Mahimkar: ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची अंकिताकडे विनवणी, म्हणाले- ‘मुली, मला काम हवंय..’

Ankita Walawalkar Video post: मराठी सिनेसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार हे सध्या कामाच्या शोधात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीवर बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ आल्याचे आपण पहिले आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर (Actor Manmohan Mahimkar) यांनी काम मिळत नसल्याची तक्रार केल्याचे देखील दिसून आले आहे. तसेच एकटेपणाला कंटाळून इच्छामरण तरी द्या, अशी मागणी त्यांनी केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले आहे.


तसेच प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावालकरने (Ankita Walawalkar) याविषयीचा व्हिडीओ पोस्ट (Video post) करण्यात आला आहे. अंकिताने याविषयी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती गिरगावमध्ये एका शूटसाठी गेल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. त्यावेळी तिची भेट माहिमकर काकांशी झाल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. यानंतर मनमोहन माहिमकर यांनी तिच्यासमोर मराठी सिनेसृष्टीमधील भयाण वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची व्यथा देखील सांगितली आहे.

यामुळे अंकिताला देखील मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली आहे की, “गिरगावमध्ये माझं एक शूट सुरु असताना मला माहिमकर काका भेटले होते. ज्यांना मी लहानपणापासून टीव्हीच्या स्क्रीनवर बघत आली आहे. मी त्यांना विनंती केली आहे की, आमच्या शूटमध्ये तुम्ही येणार का? ते लगेच तयार होऊन आल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. तसेच यानंतर मी निघत असताना ते मला येऊन म्हणाले की, मुली मला काम देशील का गं. मला कामाची अत्यंत गरज आहे. त्यांची ती भावना आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मला फार वाईट वाटल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. आज एका कलाकाराची अशी अवस्था आहे की ते माझ्याकडे काम मागत आहेत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

माझं लग्न झालं नाही, माझ्याकडे वेळ घालवायला माझं कुटुंब देखील नाही. मला इच्छामरण सुद्धा चालेल, परंतु त्याचा अर्ज मी इथे भारतात देऊ शकत नाही. मला काम द्या, जेणेकरुन माझा वेळ जाणार आहे. आणि मी त्यातून काहीतरी पैसे कमवू शकणार आहे. मला फक्त पैसे नकोत तर काम देखील करायचं आहे. त्यांची या वयातील ही वाक्य ऐकून त्यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखे वाटले आहे. मी त्यांना सांगितले आहे की, मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काम देऊ शकते? परंतु माझ्या संपर्कात असलेल्या सिनेसृष्टीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्कीचं पोहवणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. तसेच तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरुन तुमचा वेळ जाणार आहे. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाणार असल्याचे अंकिताने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

Tags

follow us