Download App

नगरचा मान वाढला! कोपरगावची गौरी पगारे ठरली सा रे ग म प लिटील चॅम्प्स महाविजेता

Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 : झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्पसच्या (Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023) नव्या पर्वाची चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेत छोट्या स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गात प्रेक्षकांची दाद मिळवली. याच पर्वातून आता नगरकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. काल 25 नोव्हेंबर रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा होता आणि सा रे ग म प लिटील चॅम्प्स 2023 च्या ट्रॉफीवर कोपरगाव येथील गौरी अलका पगारे हीने आपलं नाव कोरलं आहे. या महाअंतिम सोहळ्यात मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा ऋषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी पगारे हे स्पर्धक होते. या अटीतटीच्या स्पर्धेत मात्र गौरी पगारेने विजेती होण्याचा मान मिळवला.

Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट झिम्मा-2चा जबरदस्त टीझर रिलीज

या सोहळ्यासाठी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण सहा स्पर्धक लिटील चॅम्प्स टॉप 6 मध्ये होते. यावेळी या सहा स्पर्धकांत अटीतटीची स्पर्धा झाली. या स्पर्धेत गौरी पगारे हीने बाजी मारत स्पर्धेचे विजेतपदक पटकावले. पारितोषिक स्वरूपात गौरीला धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. उपविजेच्या श्रावणी वागळे आणि जयेश खरे यांनाही धनादेश देण्यात आले.

https://www.instagram.com/p/CyA3GVFMZM7/?next=%2Fddbsco%2Ffeed%2F&hl=bg

या महासोहळ्यात सहभागी स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. या सगळ्या स्पर्धकांत गौरी पगारे आघाडीवर राहिली. त्यानंतर प्रथम उपविजेता श्रावणी वागळे आणि द्वितीय उपविजेतेपद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हीने सूत्रसंचालन केले. हा सोहळा प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहिल असाच होता.

Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा-2’ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Tags

follow us