Download App

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या रिलीजआधीच सीता पोहोचली नाशिकच्या पंचवटीत; क्रितीचा Video Viral

Kriti Sanon Visit Temple : अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) ही बॉलीवूड मधील अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या वैयक्तिक आयुष्याला खूप खाजगी ठेवते. तिच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती सीता मातेच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. गेल्या काही दिवसापासून तिचा चित्रपटातील लूक आऊट करण्यात आला आहे. तो चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरला आहे.


आता चित्रपटाच्या रिलीज अगोदर अभिनेत्री नाशिकमध्ये दाखल झाली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटासंदर्भात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता अभिनेत्री कृती सेनन चित्रपटाच्या रिलीजअगोदर नाशिकच्या पंचवटीमध्ये पोहोचली आहे. तिने नाशिकमधील प्राचीन सीता गुफा आणि काळाराम मंदिरामध्ये जाऊन सीतामातेचं दर्शन घेतले आहे. सीता गुंफा आणि काळाराम मंदिरात कृतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.

या व्हिडीओमध्ये ती ‘राम सिया राम’ म्हणत आरती करत असल्याचे दिसून आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणं नुकतचं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गीताला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. दरम्यान कृती सेनन ‘राम सिया राम’ या गीताचे गायक सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांच्याबरोबर नाशिकच्या पंचवटीत पोहोचली आहे. त्यावेळी तिने सीता मातेचं दर्शन घेण्याबरोबर सिनेमातील ‘राम सिया राम’ या गीतावर आरती देखील केली आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

कृती सेननचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान चाहते तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर ‘जय सिया राम’,’जय श्रीराम’ अशा कमेंट्स चाहते करत आहेत. तर दुसरीकडे चित्रपटासाठी कोणत्याही थराला जाणार का? चित्रपट रिलीज होत असतानाच देव आठवतो का?”, अशा कमेंट्स अनेक चाहत्यांनी केले आहेत.

‘आदिपुरुष’ हा चित्रपटा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या चित्रपटात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us