Kurla to vengurla film actress veena Jamkar appreciate director Vijay kalamkar : “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येत आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा असून, 19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्यावर चित्रपटाची अभिनेत्री वीणा जामकरने दिग्दर्शक विजय कलमकर यांचं कौतुक केलं आहे.
तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना… ज्या लाभतात अर्थातच दुःख -संकटांचा सामना करूनच. आणि ह्या संवेदना जोपासायच्या कि प्रवाह – पतीत होऊन सोडून द्यायच्या ह्याची पण निवडच करावी लागते! तू ती केलीस…
गुडन्यूज! कतरिना कैफ-विक्की कौशल होणार आई-बाबा, फोटो शेअर करत बेबी बंप…
तू ‘सिनेमा दिग्दर्शक ‘ म्हणून खास आहेस. दोन्ही पायांना पोलिओ असलेली व्यक्ती सिनेमा दिग्दर्शक कशी बरं होऊ शकते. असं मलाही वाटलंच होतं तुझ्याकडे बघून. पण मी वेळोवेळी अनुभवलं ते तुझ्यात ‘नसलेलं ‘ मानसिक अपंगत्व, जे आमच्यापैकी बहुतेक जणांकडे थोडं फार आहेच. कल्पना करूनही समजू शकत नाही इतक्या अवहेलनेला सामोरं जाऊनही तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं… अन्यायग्रस्त माणसाचं ‘ रडणं ‘ आणि त्या ‘रडण्याचंच’ भांडवल करणं हे तुझ्याकडून अपेक्षित असलेले ‘ गुण ‘ तुझ्या आसपासही फिरकत नाहीत.. आणि तिथेच तू खूप मोठा होतोस..!
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी, सरकार कृती कधी करणार? पवारांचा सवाल
“कुर्ला टू वेंगुर्ला”चं बॉक्स ऑफिस वर कलेक्शन किती ह्यावर तुझं यश ठरत नाही.. तू तेव्हाच सगळं जिंकलंस जेव्हा पहिल्यांदा हातातली काठी बाजूला सारून, तू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झालास… काय वाटलं असेल तेव्हा तुला…? लाडक्या, Thank You Very Much…तू तुझ्याच अस्तित्वाला अर्थ दिलास त्यासाठी! नाहीतर माझ्यासारख्या अनेकांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुठून बळ मिळालं असतं? तू Super Hit है बॉस.
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
अभिनेता कितीही उत्तम असो त्याला पाठबळ नसेल तर तो सगळं टॅलेंट असूनही अपंगच रहातो. आज आमचं पाठबळ ठरला आहे श्री. अमरजीत आमलेंचा ” स्पंदन ” परिवार. स्पंदन फिल्म मूव्हमेंट. कुणाच्या फिल्मसाठी एखादा गडगंज श्रीमंत हात पुढे करतो, कुणाच्या पाठीमागे पिढीजात सिनेमा धंद्यातला अनुभव कमी येतो. आमच्या पाठीशी आज ‘स्पंदन परिवार’ उभा राहिला आहे. अमरजीत आमले आहेत.
स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 चा दिमाखदार सोहळा; स्टार प्लसने साजरी केली गौरवशाली 25 वर्षे
ऐकल्यावर कोणीही वेड्यात काढेल अशी चित्रपटनिर्मितीची चळवळ गेली 30 वर्ष गावोगावी चालवणारी ‘कलंदर’ व्यक्ती सिस्टीम ला आव्हान देणार नाही तर कोण देणार? ज्यांनी जगताना कधीच सरधोपट फायदा – तोट्याचा विचार केला नाही, अशीच व्यक्ती ‘ धमक ‘ दाखवून स्वतःच्या हिमतीवर चित्रपट वितरीत करायचा विचार करू शकते…! इतकं चित्रपटाचं वेड असलेली माणसं दुर्मिळ. तरीही ह्या वेडेपणात किती ‘शहाणपण ‘ लपलेलं आहे हे चित्रपट पाहिल्यावर अधोरेखित होतं.
हवामान खातं सांगतयं तेच घडतयं; कृषिमंत्री राहिलेले पवार मराठवाड्यातील परिस्थिती पाहून अवाक
‘स्पंदन’ परिवाराने मला काय दिलं? जेव्हा जेव्हा मी ग्रूप च्या सानिध्यात येते, तेव्हा तेव्हा काही क्षण मी अंतर्मुख होते. मला आतल्या आत सुरक्षित वाटतं. आपण कामाचा मोबदला देऊन गोड गोड बोलून वापरले जातोय हा सर्रास येणारा अनुभव तुमच्यात आल्यावर येत नाही.. थोडक्यात, तुमच्या ग्रूप मधे माझ्याही स्पंदनांचे ठोके नियमित पडतात!
पवारांना धक्का; दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पठारेंचा मुलगा, भाचा अन् पुतण्या करणार भाजपात जाणार?
‘स्पंदन’ परिवारातल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या चित्रपटासाठी जे अहोरात्र कष्ट घेताय… कितीही पगार दिला तरी कामाप्रती अशी सदभावना कोणी विकत घेऊ शकत नाही. ह्या आत्मियतेने तुम्ही फिल्म घराघरात पोहोचावी म्हणून प्रयत्न करताय.. तुमचं शब्दात मावणार नाही एवढं कौतुक, अभिनंदन, आभार आणि सलाम!!!! Paid Advertising च्या जमान्यात तुमच्या एकजूटीने वाजवलेला चित्रपटाचा डंका अखंड वाजत राहूदे ह्यापुढेही.. कारण ह्या तुमच्या आवाजाने फक्त प्रमोशन होणार नाही तर सिनेमाच्या
‘शुष्क कोर्पोरेट ‘ जगालाही मधून मधून आठवत राहिल की आपल्या आसपास काही ‘माणसं ‘ शिल्लक आहेत… स्पंदन परिवाराला अंत:करणातून शुभेच्छा, प्रेम आणि शतशः आभार!!! Love You All…- वीणा जामकर.