Download App

ऋतिक-प्रीतीची खास केमिस्ट्री थिएटरमध्ये पुन्हा अनुभवा; 20 वर्षपुर्तीनिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

Lakshya हा चित्रपट आपले वीस वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Lakshya film will re-release on the occasion of completing 20 years : बॉलीवूडचा प्रसिद्ध आणि क्लासिक चित्रपट लक्ष्य (Lakshya) आपले वीस वर्ष पूर्ण (completing 20 years) करत आहे. यानिमित्त अनोख्या कथासमोर घेऊन येणारे प्रसिद्ध क्रिएटिव्ह पावर हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट यांच्याकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा रोमांचित करण्यासाठी लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित (re-release) करण्यात येणार आहे.

कौटुंबिक जबाबदारीमुळे 10 पैकी 9 व्यावसायिकांना नवीन कौशल्ये शिकण्यात अडथळे, अहवालात मोठा खुलासा

18 जून 2004 साली हा चित्रपट रिलीज झाला होता. आकर्षक कथा, शानदार अभिनय आणि देशभक्तीचा संदेश या सर्व गोष्टींनी या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. त्यानंतर आता 21 जून 2024 ला हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हा चित्रपट देशातील 20 गुण अधिक शहरांमध्ये 50 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Alka Yagnik: अलका याज्ञिकला अचानक ऐकू येणं का बंद झालं, जाणून घ्या लक्षणे आणि कारणं…

जावेद अख्तर यांनी या चित्रपटाचे कथा लिहिली होती. तर त्यांचा मुलगा आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये अभिनेता ऋतिक रोशन याने करण शेरगिल ही मुख्य भूमिका साकारली होती. ऋतिक सोबत प्रीती झिंटा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. सैन्यावर आधारित असलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये देशभक्तीचा संदेश पसरवला. तसेच ऋतिक आणि प्रीतीची खास केमिस्ट्री देखील चाहत्यांना खिळवून ठेवणारी ठरली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऋतिक-प्रीतीची खास केमिस्ट्री थिएटरमध्ये पुन्हा अनुभवता येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज