प्रेरणा जंगम
Savita Malpekar: ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar)या नाटक, मालिका (Series) आणि चित्रपट (Movie) माध्यमातून गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण काम करत आहेत. नुकतच त्यांनी रंगमंचावर अनेक वर्षांनी पुनरागमन केले आहे. (LetsUpp Exclusive) सुमी व आम्ही या नाटकातून त्या पुन्हा एकदा मोहन जोशी यांच्यासोबत रंगमंचावर पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लेट्अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असताना मालिका विश्वात काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी यावेळी शेयर केले आहे.
मालिकांमध्येही तितकच जीव ओतून काम करत मालिकाविश्वात अभिमानाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय टेलिव्हिजनवर काम करणे हे त्यांच्यासाठी ब्रेड बटर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सविता मालपेकर म्हणतात की, “मालिकांमध्ये सध्या असे झाले आहे की, मालिका जेव्हा सुरु होते तेव्हा एक लेखक असतो मात्र कालांतराने हळूहळू वेगवेगळे लेखक येतात आणि त्यांच्या डोक्यात जे काही येतं ते लिहीतात आणि आम्हाला पाठवतात मग आम्ही ते करतो.
राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी
कोणीही मालिकांना कितीही नाकं मुरडू देत तरीही मी मालिका करते कारण ते आमचे ब्रेड बटर आहे. नाटक करणे हे समाधान आहे पण घर चालवण्याचं ब्रेड बटर या मालिका आहेत. त्यामुळे मी मालिका म्हटलं की नाकं मुरडत नाही. सध्याचा प्रेक्षक इतका हुशार आहे की त्यांना सगळं माहिती आहे. शिवाय नाटकात काम करणारे कलाकार जेव्हा मालिकांमध्ये काम करतात तेव्हा ते जीव ओतून काम करत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले. नाटकातील कलाकार मालिकांमध्ये पाट्या टाकत नाहीत तर चांगलेच काम करतात.
राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी
जे नाटकातून गेलेले, नाटकात काम केलेले कलाकार आहेत, ते काहीही लिहून येऊ देत ते पाट्या टाकायचं काम करत नाही. नाटकातले कलाकार तितकेच जीव ओतून मालिकांमध्येही काम करतात. शिवाय मालिकांमध्ये पैसा गुंतवणाऱ्या निर्मात्यांना त्यांचा कामातून मोबदला देण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. माझं नेहमी असे म्हणणे असते की जेव्हा आपण निर्मात्यांकडून पैसे घेतो ते पैसे त्याने मेहनतीने, कष्टाने कमावलेले पैसे असतात. आपण प्रामाणीकपणे मोबदला दिला पाहिजे. तेव्हा अनुभवी कलाकार म्हणून सविता मालपेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील प्रवासातील अनुभवातून हे मत व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.