Oscars 2023 मध्ये ‘नाटू-नाटू’ वर लाईव्ह परफॉर्म, अकादमीची ट्विटरवर माहिती

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]

NATU NATU

NATU NATU

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.

त्यानंतर आता हे गाणं राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांच्याबरोबर ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर केलं जाईल, असं अकादमीने स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांच्याकडून रिहर्सल सुरू आहे. मात्र ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे दोन्ही स्टार स्टेजवर या गाण्यावर डान्स करतील की नाही, याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

28 फेब्रुवारीला अकादमीने ट्विटरवर यादसंदर्भात घोषणा करत ऑस्कर इव्हेंटमध्ये नाटू नाटू गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती दिली. ‘राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ 95 व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,’ असं त्यांनी यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

याबद्दल सोशन मिडीयावर , राम चरणने सांगितले की, ‘आम्ही कोठेही ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करू, ज्यासाठी आमचे खूप कौतुक होत आहे. कारण आम्हाला सर्वत्र परफॉर्म करण्याची संधी मिळत नाही. पण ऑस्कर सोहळ्यात जर आम्हाला त्यावर नाचण्याची संधी मिळाली, तर आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आम्हाला खूप आनंद मिळेल. स्टेजवर संपूर्ण गाण्यावर नृत्य करणे कठीण होईल. कारण त्यासाठी भरपूर श्वास आणि ऊर्जा लागते. पण नक्कीच हुक स्टेप्स नक्की करू.’ असंही तो म्हटला. मात्र ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे दोन्ही स्टार स्टेजवर या गाण्यावर डान्स करतील की नाही, याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, राम चरण म्हणाला…

‘आरआरआर’ मधील ‘नाटू नाटू’ हे गाणे राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यावर या स्टार्सच्या डान्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ‘नाटू नाटू’ या गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे शीर्षक पटकावले. प्रेम रक्षित यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. जे युक्रेनमधील कीव येथील मारिन्स्की पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आले आहे.

Exit mobile version