Download App

Sukh Kalale : मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत

Sukh Kalale : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवीन प्रयोग करणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे, नवी मालिका ‘सुख कळले’ (Sukh Kalale). सामान्य माणसाची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. माधव -मिथिलाची जोडी ‘सुख कळले’ (Colors Marathi) या मालिकेतून चांगलीच व्हायरल होऊन संपूर्ण महाराष्ट्रालातील घराघरांत पोहोचली.

प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला माधव आणि मिथिला यांच्याकडे बघून हेवा, वाटावा असे हे दोघे आहेत. (Marathi serial) एकमेकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे. एकमेकांना समजून घेत, प्रत्येक कठीण परिस्थित एकमेकांना साथ देणे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिला यांची जोडी सगळयांसाठी आदर्श बनली आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत घट; 11 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण

मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने तिच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी महाराष्ट्रातील फेमस हाऊसहोल्ड, डिजिटल क्रिएटर, यूट्युबर मधुरा बाचल यांची रेसिपी बघून उपमा बनवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांमध्ये मधुरा यांचा नवरासुद्धा माधवची उपमा बनवण्यसाठी मदत करतो. पण माधवचा हा प्रयत्न्न यशस्वी होतो का? की, मधुरा स्वत: मदतीला येते. हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ माधव- मिथिलाची निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा ‘सुख कळले’ पाहा 22 एप्रिलपासून सोम ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज