“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

गप्पांच्या ओघात जेव्हा माधुरीने सांगितले की, तिला नम्रता संभेरावची ‘लॉली’ची भूमिका खूप आवडते, ज्यामुळे नम्रताचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Untitled Design   2026 10 22T162239.673

Untitled Design 2026 10 22T162239.673

Madhuri did an exact imitation of Namrata! : सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून माधुरी दीक्षित तिच्या सहज सुंदर शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रश्नांची उत्तरं आणि खेळादरम्यान, स्पर्धक आणि सेलिब्रेटी पाहुण्यांशी होणाऱ्या तिच्या दिलखुलास गप्पांमुळे प्रेक्षकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक देखील पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्रत्येक भाग अधिकच खास होतो आहे. या शनिवारी असाच मनोरंजनाचा धमाका होणार आहे, कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम या विशेष भागात येणार आहे.

यावेळी माधुरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सगळ्या कलाकारांविषयी दिलखुलास गप्पा मारल्या, विविध प्रश्न विचारले. गप्पांच्या ओघात जेव्हा लॉलीचा विषय निघाला तेव्हा माधुरीने सांगितले की, तिला नम्रता संभेरावची ‘लॉली’ची भूमिका खूप आवडते, ज्यामुळे नम्रताचा आनंद गगनात मावेनासा झाला. लॉलीबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, “मला ही लॉली खूपच आवडते!” यावर नम्रताने आश्चर्यानं माधुरीला विचारलं, “तुम्ही माझं हे कॅरेक्टर पहिलं आहे?” माधुरीने होकार देत नम्रताने केलेल्या डेंटिस्टच्या स्किटची आठवण सांगितली. त्यावर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली, आणि माधुरीने – “मेरी आँखों में झाँको!” हा लॉलीचा प्रसिद्ध व्हायरल डायलॉग म्हणून दाखवला, तेव्हा मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला.

जपानमध्ये भारतीय पॅरा-जलतरणपटूला अटक, हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

यावेळी नम्रताने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे पात्र कसं तयार झालं, याचा प्रवास उलगडला. नम्रता म्हणाली, “मी लालबागमधील एका चाळीत लहानाची मोठी झाले, लहानपणापासूनच मी चाळीतील तसेच आजुबाजूच्या बायकांचे वेगवेगळे हावभाव आणि बोलण्याच्या पद्धती जवळून पहात आले. आमचे लेखक आणि क्रिएटिव्ह टीम नेहमीच प्रत्येक कॅरेक्टरसाठी काहीतरी वेगळे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. लॉलीची हेअरस्टाईल मी स्वतःच ठरवली कारण मला ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी अशी इच्छा होती. लॉली थोडेफार इंग्रजी बोलते, पण आपण ते खूप उत्तम बोलतोय असा तिला पूर्ण आत्मविश्वास असतो. अशा इथून-तिथून घेतलेल्या छोट्या गोष्टींना थोडे वाढवून-चढवून सादर केल्यानं हे अनोखं कॅरेक्टर तयार झालं.” ‘कोण होणार करोडपती’ पाहा, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिववर.

Exit mobile version