Download App

Madhuri Dixit : “त्या’ किसिंग सीनचा… ” अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ने घेतला होता मोठा निर्णय

Madhuri Dixit Birthday: अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) म्हणजेच सर्वांची लाडकी ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्मी कुटुंबातील नसून देखील ‘धकधक गर्ल’ हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केले आहे. (Madhuri Dixit Birthday) आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची (Bollywood) ‘धक-धक गर्ल’ म्हणून मोठी ओळख देखील आहे. ‘धकधक गर्ल’ हिने तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे.


‘धकधक गर्ल’ने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेत्रीने काही कौटुंबीक चित्रपटामध्ये काम केलं तर काही रोमाँटिक चित्रपटामध्ये देखील ‘धकधक गर्ल’ने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एका चित्रपटात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आज देखील पश्चाताप होत आहे. १९९३ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री यावर मोठा खुलासा केला होता.

१९८८ साली प्रदर्शित झालेला ‘दयावान’ चित्रपट अभिनेते विनोद खन्ना (Actor Vinod Khanna) आणि ‘धकधक गर्ल’ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात विनोद खन्ना आणि ‘धकधक गर्ल’ यांचा एक किसिंग सिन होता. सीन शूट करत असताना विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. तेव्हा ‘धकधक गर्ल’ने फक्त आणि फक्त २० वर्षांची होती. जेव्हा विनोद खन्ना यांना स्वतःच्या चुकुची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी ‘धकधक गर्ल’ची माफी देखील मागितली होती.


शुटिंगच्या दरम्यान विनोद खन्ना यांनी केलेल्या या कृत्यामुळे ‘धकधक गर्ल’ला आजही मोठा पश्चाताप होतो. शुटिंगच्या दरम्यान ‘धकधक गर्ल’ला प्रचंड त्रास झाला आहे. विनोद खन्ना ‘धकधक गर्ल’पेक्षा तब्बल २० वर्ष मोठे होते. म्हणून अनेकदा विचार करून विनोद खन्ना यांच्याबरोबर इंटिमेट सीन करण्यासाठी ‘धकधक गर्ल’ तयार झाली होती. ‘दयावान’ चित्रपटाची चर्चा आज देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगली असते.


चित्रपटातील किसिंग सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होवू नये, म्हणून अभिनेत्रीने दिग्दर्शकांकडे विनंती देखील केली होती. पण त्याचा काही फायदा झाला नाही. ‘धकधक गर्ल’ची इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्याने दिग्दर्शकांनी तिची एकही गोष्ट ऐकली नव्हती. जेव्हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि ‘धकधक गर्ल’च्या त्या सीनमुळे अनेक चर्चा रंगायला सुरुवात झाली होती.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

‘धकधक गर्ल’ हिच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटानंतर अभिनेत्री एका रात्रीमध्ये स्टार झाली. त्यानंतर अभिनेत्रीने ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या सुपर हीट चित्रपटामध्ये काम केले आहे.

Tags

follow us