जितेंद्र जोशी ‘मॅजिक’ चित्रपटात दिसणार एन्काउंटर स्पेशालिस्टच्या नव्या भूमिकेत; चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

आजपर्यंत अनेक भूमिका अजरामर करून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात नव्या भूमिकेत करणार जादू.

Untitled Design (26)

Untitled Design (26)

Magic movie ready to meet the audience : आजपर्यंत अनेक भूमिका अजरामर करून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात नव्या भूमिकेत जादू करणार आहे. ‘मॅजिक’ (Magic) या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) एन्काउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत असून, 1 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं. तुतारी व्हेंचर्स (Tutari Ventures) या प्रोडक्शन हाऊसच्या राजू सत्यम (Raju Satyam) यांनी ‘मॅजिक’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आई कुठे काय करते’ सारख्या बहुचर्चित मालिकांचं दिग्दर्शन करणाऱ्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन तर मंदार चोळकर वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चित्रपटात जितेंद्र जोशी, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे. “मॅजिक” या चित्रपटात अरूण राऊत या एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या या “मॅजिक” चित्रपटाची गोष्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. आजवर अनके फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने आपली वेगळी मोहोर उमटवली असून उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला “मॅजिक” चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Exit mobile version