Gaurav More post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) कलाकार सध्या चांगलेच चर्चेत आहे. हे कलाकार सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहे. अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये या कलाकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गौरव मोरे एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल धुमाकूळ घालत आहे. गौरव अमेरिकेच्या रस्त्यावर ‘चाहे जो तुम्हे पूरे दिल से’, या गाण्यावर व्हिडिओ काढल्याचे दिसून आले आहे.
अनेक चाहत्यांनी गौरवच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. एकाने लिहिलं आहे. “गौऱ्या भाई…..अमेरिकेतल्या लोकांना west indies मधून आल्यासारखे वाटतं असेल रे तुम्ही…म्हणून ते तुमच्याकडे पाहत नाही भाई..कदाचित ते तुम्हाला फॉरेनर समजत असतील….” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “खर सांगू पाठीमागून पहील्यावर्ती अस वाटल की साऊथ आफ्रिका वालेच आहेत” अशी कमेंट केली आहे.
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. कोरोनाच्या काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन केलं होतं.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम ब्रेकवर आहे. परंतु या कार्यक्रमातील कलाकार अमेरिकेत मराठी प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गौरव मोरेने अमेरिकेच्या कार्यक्रमाच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या कार्यक्रमाला अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौरवने हा व्हिडीओ पोस्ट करत तिथल्या प्रेक्षकांचे आभार मानले होते.