Download App

Prajakta Mali: ‘जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूत’; प्राजक्ताची समीर चौघुलेसाठी खास पोस्ट

  • Written By: Last Updated:

Prajakta Mali Post: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) शोमधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेता समीर चौघुलेचा (Samir Choughule ) आज ५० वा वाढदिवस आहे. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी आपल्या मराठी कलाविश्वामध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.


आज समीर चौघुलेचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (Samir Choughule birthday) त्यानिमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर समीर चौघुलेंबद्दल एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले यांच्यासोबत उभी असल्याचे दिसून आली आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

दरम्यान प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. तर काहींनी समीर चौघुलेला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत येत आहे. एका मुलाखतीमध्ये समीर चौघुलेनं सांगितलं होतं की त्याला अभिनय नाही तर क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं होतं. तो म्हणाला, ‘मी आधी स्पोर्ट्समन होतो. मी शाळेत असताना खो-खो, कबड्डी टीमचा कॅप्टन होतो.

Tags

follow us