Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार 

Prithvik Pratap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक हटके कलाकार दिले आहेत. (Social media) जसे की गौरव मोरे, ओंकार राऊत, (New Marathi Movie) वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं चाहत्यांच्या मनामध्ये अनोखं स्थान निर्माण केलं आहे.   View this post on […]

Prithvik Pratap

Prithvik Pratap

Prithvik Pratap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक हटके कलाकार दिले आहेत. (Social media) जसे की गौरव मोरे, ओंकार राऊत, (New Marathi Movie) वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं चाहत्यांच्या मनामध्ये अनोखं स्थान निर्माण केलं आहे.


यामध्ये एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज खूपच लोकप्रिय ठरला आहे. असा हा लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक आता लवकरच आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान बोलत असताना पृथ्वीक प्रतापनं त्याच्या आगामी सिनेमाबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. तो म्हणाला आहे की, “हास्यजत्रा आयुष्यभर तुमच्या आणि आमच्यासाठी राहणार आहे.

परंतु यासोबत माझा लवकरच एक नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्याचं नावं ‘डिलिव्हरी बॉय’ असं असणार आहे. या सिनेमात मी आणि प्रथमेश परब एका दमदार भूमिकेत बघायला मिळणार आहोत. तसेच पुढे पृथ्वीक म्हणाला की, या सिनेमासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. कारण सिनेमाच चित्रीकरण पूर्ण झालं आहे. फक्त डबिंग बाकी राहिले आहे. हा सिनेमा कधी चाहत्यांच्या समोर घेऊन येऊ, याची आम्हाला मोठी उत्सुकता लागली आहे.

Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन

तसेच हास्यजत्रेमधील इतर सर्व कलाकारांचे देखील सिनेमा  प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. गौरव मोरेचा तर ऑक्टोबरमध्ये मोठा जलवा राहणार आहे. कारण त्याचे तीन सिनेमा या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. यामुळे ऑक्टोबर महिना गौरवसाठी खूपच खास असणार आहे. ‘अंकुश’, ‘बॉईज ४’ आणि ‘लंडन मिसळ’ या सिनेमात गौरव पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बॉईज ४’मध्ये गौरवसोबत  निखिल बने देखील बघायला मिळणार आहे.

Exit mobile version