Kon Honar Crorepati: सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. (Kon Honar Crorepati) प्रत्येक शनिवारी या शोमध्ये काही खास पाहुणे भेटीला येत असतात. या आठवड्यामध्ये ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते (Actors) आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हे हॉट सीटवर येणार असल्याची माहिती आहे.
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम ‘कोण होणार करोडपती’चा रंजक खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग राहणार आहे आणि या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी जोरदार गप्पा रंगणार आहेत. या जुन्या मित्रांबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से बघायला प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. तसेच ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ३ जुने मित्र एकत्र येणार आहेत. ते बघणं देखील नक्कीच गमतीदार ठरणार आहे.
त्यांची पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे रंजक किस्से प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून बघायला मिळणार आहे. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचा गप्पा फारच रंगल्या. शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. (kon honar crorepati)
महेश मांजरेकर यांनी ‘कूछ तो गडबड है’ असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आहे. महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्या झालेल्या ऑडिशनची आठवण यावेळी सांगितली आहे. तसेच मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाचवेळी एकाच मंचावर बघणे ही चाहत्यांसाठी अतिशय पर्वणी ठरणार असल्याचे ठरणार आहे.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत. तसेच कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येणार आहे. त्यासाठी ते कायम पुढाकार घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. हा विशेष भाग १७ जून म्हणजेच शनिवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.