प्रेम, मैत्री अन् बदलत्या नात्यांची कहाणी; ‘मैत्रेया’चा टीझर प्रदर्शित

Maitreya Teaser : एकमेकांच्या आयुष्यातील खास व्यक्ती असलेल्या या चौघांच्या नात्यांमध्ये नवीन व्यक्तीच्या आगमनानंतर बदल होऊ लागतात.

News Photo   2026 09 21T175720.225

Maitreya teaser released.

Maitreya Teaser : काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज (Love) सामावतात, तर काही नात्यांमधील भावना मैत्रीच्या पलीकडे जातात. प्रेम आणि मैत्रीच्या याच गुंतागुंतीच्या भावविश्वाची झलक दाखवणाऱ्या ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. टीझरमधून आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधील बदलते समीकरण प्रेक्षकांसमोर येते.

एकमेकांच्या आयुष्यातील खास व्यक्ती असलेल्या या चौघांच्या नात्यांमध्ये नवीन व्यक्तीच्या आगमनानंतर बदल होऊ लागतात. आतापर्यंत आपली वाटणारी व्यक्ती अचानक अनोळखी भासू लागते आणि त्यातून नात्यांमध्ये निर्माण होणारा भावनिक गुंता टीझरमध्ये पाहायला मिळतो. मैत्री, जवळीक, मस्ती आणि नात्यांमधील हक्काच्या भावनेसोबतच काही न बोललेल्या भावनांकडेही टीझर लक्ष वेधतो.

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी ….

या चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी नात्यांच्या याच वेगळ्या पैलूवर भाष्य केले आहे. “एकीकडे प्रेम, एकीकडे मैत्री अन् एकीकडे मैत्रीत गोंधळलेलं प्रेम” या वाक्यातून चित्रपटातील नात्यांचा पेच अधोरेखित होतो. प्रेम आणि मैत्री यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे, याचा शोध ‘मैत्रेया’च्या कथेतून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्माते मनोज खळतकर यांनी तरुणाईच्या भावविश्वासोबतच संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असा मनोरंजनप्रधान चित्रपट साकारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तरुणांच्या नात्यांमधील सहजपणा, गंमत आणि भावभावना या चित्रपटातून अनुभवता येणार आहेत. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’चे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. ‘मैत्रेया’ येत्या 23 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version