‘तो फिर आओ’ आणि ‘तेरा मेरा रिश्ता’ नव्या अंदाजात; ‘आवारापन 2’ची मोठी घोषणा

नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात इम्रान हाश्मी, दिशा पटानी आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे.

Untitled Design (38)

Untitled Design (38)

Major announcement regarding ‘Awarapan 2’ : निर्माते विशेष भट्ट यांनी पुष्टी केली आहे की संगीतकार मिथून आणि गीतकार सईद कादरी हे आवारापन 2 साठी संगीत देणार आहेत. यामध्ये चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली “तो फिर आओ” आणि “तेरा मेरा रिश्ता” ही गाणी नव्या स्वरूपात सादर केली जाणार असून, चित्रपटासाठी एक पूर्णपणे नवीन गाणेही तयार करण्यात येत आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात इम्रान हाश्मी, दिशा पटानी आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून, हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मूळ आवारापन हा चित्रपट त्याच्या भावनिक कथानक आणि अविस्मरणीय संगीतामुळे कल्ट क्लासिक ठरला होता. त्याच वारशाला पुढे नेताना आवारापन 2 मध्ये आधुनिक धाटणीचे संगीत सादर केले जाणार आहे. विशेष भट्ट यांनी या चित्रपटाचे वर्णन एक अ‍ॅक्शन-ड्रामा म्हणून केले असून, त्यात भावनांनी परिपूर्ण कथानक आणि प्रभावी संगीताला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

याबाबत विशेष भट्ट म्हणाले, “या चित्रपटासाठी योग्य संगीताची ओळख शोधताना माझ्या मनात वारंवार दोनच नावे येत होती — मिथून आणि सईद कादरी साहेब. या कथेला आवश्यक असलेली भावनिक उंची आणि खोली तेच देऊ शकतील, याची मला खात्री होती. त्यांच्या संगीतामध्ये वेदना आणि आशा, जवळीक आणि भव्यता यांचा सुंदर मिलाफ असतो आणि आमच्या चित्रपटालाही याच भावविश्वाची गरज होती.”

मी सर्वांची माफी मागतो…, उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये शिंदे अन् फुटीर खासदारांवर भडकले

सईद कादरी यांनीही या सिक्वेलशी असलेल्या भावनिक नात्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मन प्रामाणिक असेल आणि त्यात भटकंतीची ओढ व अस्वस्थता असेल, तर त्यातून जन्म घेणाऱ्या शब्दांमध्ये एक वेगळेच सत्य असते. आवारापन, त्याचा सिक्वेल आणि विशेश फिल्म्स यांच्याशी माझे असेच भावनिक नाते आहे. आवारापन 2 मधील गाण्यांमधून प्रेक्षकांनाही ती भावना अनुभवता येईल.”

मिथून यांनीही या टीममधील सर्जनशील जुळवणीबद्दल बोलताना सांगितले, “आम्ही एकत्र निर्माण केलेली प्रत्येक संस्मरणीय रचना ही आमच्या परस्पर समन्वयामुळे शक्य झाली आहे. विशेष भावनिक कथानकाची मजबूत पार्श्वभूमी देतात, तर सईद कादरी साहेब अतिशय सोप्या शब्दांत गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करणारी कविता लिहितात. आवारापन 2 चे संगीत तयार करताना आम्ही याच केमिस्ट्रीवर पूर्ण विश्वास ठेवला. पुन्हा एकत्र येऊन इतके प्रामाणिक आणि मनापासून संगीत तयार करण्याचा आनंद काही वेगळाच आहे.”

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचा भाऊ ठरला सिया-चेतनच्या ओळखीचा दुवा, तपासातून महत्वाची माहिती समोर

“तो फिर आओ” आणि “तेरा मेरा रिश्ता” या लोकप्रिय गाण्यांच्या नव्या आवृत्त्यांसोबतच, आवारापन 2 साठी एक पूर्णपणे नवीन गाणेही तयार केले जात आहे. त्यामुळे या फ्रँचायझीच्या संगीत प्रवासात एक नवा अध्याय जोडला जाणार असून, मूळ चित्रपटाच्या संगीताचा भावनिक गाभाही कायम राखला जाणार आहे.

आवारापन 2 चे निर्माते विशेष भट्ट असून दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. इम्रान हाश्मी, दिशा पटानी आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version