Makarand Anaspure : मराठमोळा मकरंद अनासपुरे एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

Makrand Anaspure : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा एसटी महामंडळाविषयी (ST Corporation) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राबवला जात आहे. तो आजून कसा प्रभावीपणे राबविण्यात यावा, यासाठीची ही घोषणा केली असल्याचे सांगितले.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T144952.375

Makarand Anaspure

Makrand Anaspure : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा एसटी महामंडळाविषयी (ST Corporation) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राबवला जात आहे. तो आजून कसा प्रभावीपणे राबविण्यात यावा, यासाठीची ही घोषणा केली असल्याचे सांगितले.


मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर (Brand Ambassador ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मराठमोळा मकरंद अनासपुरे यांच्या नावाची एसटी महामंडळाच्या सदिच्छादूत पदावर नियुक्ती झाल्यावर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करत खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहे. यासगळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीविषयी मोठा आनंद व्यक्त केला आहे. एसटीच्या अनेक योजना आहेत, त्या मला माहिती आहेत.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

याअगोदर देखील अनेकवेळा शुटींगच्या दरम्यान मी एसटीमधून प्रवास केला आहे. यामुळे या नव्या जबाबदारीची भूमिका पार पाडत असताना मला त्याचा उपयोग होणार आहे. एसटी प्रवास हा कधीही न विसरता येणारा प्रवास आहे. हे मला आवर्जून सांगायला आवडणार आहे. लालपरीच्या अशा कितीतरी आठवणी आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जी घोषणा करण्यात आली आहे, ती खरच खूप समाधानकारक आणि आनंदी आहे. एसटीसाठी जे काही करता येणार ते करण्यावर मी भर देणार असल्याचे आणि प्रयत्न करणार असल्याची भावना मकरंद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Exit mobile version