Malaika Arora Father Anil Arora Death : अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora ) वडील अनिल अरोरा (Anil Arora Death) यांनी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून आत्महत्या केल्याची बातमी समोर (Malaika Arora Father Death) आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या असल्याचे मानले जात होते, परंतु आता पोलिसांनी त्यामागील कारण सांगितले आहे.
इस संसार में सुखी कोई नही है चाहे उसके पास कितना भी धन क्यों न हो।
अभिनेत्री मलाइका अरोड़ा के पिता अनिल अरोड़ा ने छत से कूदकर आत्महत्या की।#MalaikaArora pic.twitter.com/zobtgvxFvt
— मेघवाल साहब (@KaluRamLuniwal) September 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. ते म्हणाले की पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अरोरा यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमागील कारण अद्याप समजले नसून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मलायकाच्या वडिलांचे बुधवारी सकाळी निधन झाले हे खरे आहे. त्यांनी आत्महत्या केलेली नाही. तो अपघात होता. हे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.
Shocking to hear the death of Actress Malaika Arora’s father Anil Arora. Reports claim he committed suicide by jumping off a terrace
No suicide note discovered. Reason yet to be established. #MalaikaArora pic.twitter.com/kRU5sNCqfW
— Himanta Biswa Sarma ( Congressiyon ke Papa) Parody (@HimantaBiswa_S) September 11, 2024
सूत्रानुसार पोलीस पंचनामा करणार आहेत. घटनास्थळाची संपूर्ण तपासणी केली जात आहे. सध्या आजूबाजूच्या लोकांचे स्टेटमेंट अधिकृतपणे रेकॉर्ड केले जाणार आहे आणि या प्रकरणाची कसून तपास केला जाणार आहे. सध्या पोलिसांनी फारशी माहिती दिलेली नाही.
सिर्फ पैसा होना ही सब नही होता, क्योंकि इतना सब होकर भी बड़े बड़े सिलेव्रिटी के पैरेंट्स आत्महत्या कर रहे है।
अभिनेत्री मलाइका अरोड़ा के पिता अनिल अरोड़ा ने छत से कूदकर आत्महत्या की।#MalaikaArora#AnilArora pic.twitter.com/LZkwQKCrLI
— Lokesh 🕉️ (@LokeshKhatri__) September 11, 2024
पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण शवविच्छेदन अजूनही सुरू आहे. अहवाल आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ
मलायकाच्या पालकांचा घटस्फोट…
अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. ‘माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे तिने या मुलाखतीत सांगितले होते.