Download App

Arbaaz Khan Wedding : अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? Video Viral

Malaika Arora Video Viral: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) 24 डिसेंबर 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत (Shura Khan) पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. बहिण अर्पिता खानच्या घरी त्यांचा निकाह सोहळा पार पडला, ज्यात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. त्याचा मुलगा अरहान खानही (Arhaan Khan) अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. पण, या काळात त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा दिसली नाही. दरम्यान, अरबाज त्याच्या दुसऱ्या लग्नात व्यस्त असताना त्याच रात्री मलायका चर्चबाहेर दिसली. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे, यावर चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.


मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा अधिकृतपणे 11 मे 2019 रोजी घटस्फोट झाला आणि ते 2017 पासून वेगळे राहू लागले. आता अरबाज गर्लफ्रेंड शूरासोबत दुसऱ्या लग्नात व्यस्त असताना त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त होती. ती मित्रांसोबत ख्रिसमस पार्टी करत होती. या सेलिब्रेशनमध्ये 2023 च्या ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनेत्री चर्चबाहेर दिसली. यावेळी ती शॉर्ट ड्रेस आणि ब्लेझरमध्ये दिसली. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तिने लाल रंगाच्या हाय हिल्स आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला होता.

चाहत्यांची प्रतिक्रिया: मलायका अरोराचा हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. हे समोर आल्यानंतर चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘आता तिचा पती अरबाज खानला हेवा वाटावा म्हणून ती अर्जुन कपूरशी लग्न करेल.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुझा पती दुसऱ्याशी लग्न करतोय, तिकडे जा.’ तिसर्‍याने लिहिले आहे की, ‘तू अरबाज खान सोबत नाहीस का? त्याच्या लग्नाला जायचे का?’ तर आणखी एका यूजरने लिहिले, ‘आता मलायका अर्जुनसोबत करेल.’ सोबतच दुसऱ्या एका यूजरने लिहिले, ‘ती आतून दुखावली आहे. चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. तिचे डोळे भरून आले आहेत.” त्याचप्रमाणे चाहते तिच्या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Arbaaz Khan Wedding: अरबाज खान पुन्हा चढला बोहल्यावर; 56व्या वर्षी बांधली लग्नगाठ!

मलायकासाठी सलमानने गिफ्ट पाठवले: अलीकडेच मलायका अरोराने सलमान खानबद्दल खुलासा केला की, तिच्या पतीचा भाऊ आणि अभिनेता सलमान खानने तिच्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने खास भेट पाठवली आहे. ‘भाईजान’ ब्रँड बीइंग ह्युमनकडून अभिनेत्रीला एक गिफ्ट बॉक्स पाठवण्यात आला आहे. गेल्या काही काळापूर्वी सलमानने घोषणा केली होती की त्याचा ब्रँड महिलांसाठी एक नवीन कलेक्शन लाँच करत आहे. यावर मलाइकने बिइंग ह्युमनचे कौतुक केले आणि ख्रिसमससोबतच वाढदिवसानिमित्त सलमानने दिलेल्या भेटवस्तूंबद्दल सांगितले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज