Download App

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

Sirf Ek Banda Kafi Hai: हिंदी सिनेमासृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी (Actor Manoj Bajpayee) हे अनेक कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी चाहत्यांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा अनेक भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ सिनेमाचं नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) देखील मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

नुकताच मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ (Sirf Ek Banda Kafi Hai) हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा आसराम बापू (Asaram Bapu) यांच्या केसवर आधारीत असल्याची चर्चा झाली आणि यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला होता. परंतु चाहत्यांनी मात्र सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मनोज यांच्या कामाचे देखील चाहते प्रचंड प्रमाणात कौतुक करत आहेत.

त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, काही निवडक सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार सिनेमागृहांच्या शो’ ची संख्या वाढणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले आहे. परंतु आता लवकरच आजून काही सिनेमागृहातही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामुळे सर्वप्रथम ओटीटीवर आणि त्यानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा पहिला सिनेमा ठरणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की याबद्दल म्हणाले आहे की, “सिनेमागृहाच्या प्रदर्शनाबद्दल स्टुडिओ आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशी चर्चा प्रथमच कोणत्या सिनेमाच्या बाबतीत सुरू आहे, हे फार चांगलं लक्षण आहे. सिनेमागृहाच्या माध्यमातून हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि एका दिग्दर्शकाला हेच हवं असतं. जर हा सिनेमा मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये लागला तर मला आनंदच होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे या सिनेमामध्ये ?

‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमाच्या सुरुवातीला एका अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जात असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलीस त्या बाबाला अटक करतात. दरम्यान बाबांचे भक्त अटक केल्याने संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान मुलीचे आई-वडील पीसी सोळंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहावा लागणार आहे.

https://letsupp.com/entertainment/movie-review-manoj-bajpayee-sirf-ek-banda-kafi-hai-movie-review-50640.html

अभिनेता मनोज वाजपेयीने ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमात खूपच धमाल काम केले आहे. राजस्थानच्या भाषेवर त्याचे उत्तम प्रभुत्व मिळवलं आहे. या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत हे सिनेमा पाहताना दिसून येणार आहे. एकंदरीत मनोजने पीसी सोलंकीची गोष्ट खऱ्या अर्थाने जिवंत केल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलीची भूमिका अदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे. तिचे देखील काम उत्तम प्रकारे असल्याचे दिसून येत आहे. विपिन शर्माचा अभिनय जबरदस्त आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपले पात्र योग्यपद्धतीने साकारले असल्याचे दिसून आले आहे.

Tags

follow us