Download App

Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लरने पटकावला ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ अवॉर्ड

Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी कायम ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत (Social media) आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. तिने नुकताच ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ हा खास पुरस्कार पटकावला आहे.


मानुषी छिल्लर या एक भारतीय अभिनेत्री मॉडेल आणि मिस वर्ल्ड आहे.मानुषी छिल्लर यांनी फेमिना मिस इंडिया 2017 च्या स्पर्धेत हरियाणा राज्यातील आहे. मिस वर्ल्ड आणि ‘ब्युटी विथ अ पर्पज’ सोबत जिंकणारी मानुषी छिल्लर या पहिल्या भारतीय महिला आहे. मानुषी छिल्लर ही एक आयकॉन स्टाईल अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. पण तिच्या आकर्षक एअरपोर्ट लुक्स आणि रेड कार्पेट लूकने ती कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्ससह ती एक फॅशनिस्टा बनली आहे.

तसेच ती बॉलिवूडमध्ये तिने एक अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील सेट असल्याचे बघायला मिळत असत. पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

तसेच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा सिनेमा भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच सांगितलं जात आहे. मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे, आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती केली आहे. प्रीतमने या सिनेमाला संगीत दिले आहे.

Jawan Box Collection: किंग खानचा बॉक्स ऑफिसवर जलवा; ७ दिवसात केली एवढी कमाई

मानुषी छिल्लरच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत, परंतु आता सगळे हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह द ग्रेट इंडियन फॅमिली एक अनोखा सिनेमा असणार यात शंका नाही. मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या सिनेमात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली २२ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित होणार असून एक उत्तम सिनेमा सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

Tags

follow us