Download App

Ajinkya Deo Post: आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; म्हणाला, ‘माय आता भेटत … ‘

  • Written By: Last Updated:

Ramesh Deo And Seema Deo : मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Actress Seema Deo) यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. २४ ऑगस्ट दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. (Social media) सीमा देव यांच्या निधनामुळे देव कुटुंबाला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. या दु:खामधून अद्याप त्यांचे कुटुंब सावरले नाही. तसेच सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव (Actor Ajinkya Deo) याने भावूक होऊन सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


अजिंक्य देव यांनी आई सीमा देव यांच्या निधनानंतर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते खाली मान घालून एकटक पाहत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘ती होती आणि आता ती नाही,’ असं कॅप्शन त्या व्हिडीओच्या खाली त्याने दिल आहे. त्यानंतर अजिंक्य यांनी आई-बाबांच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली आहे. यामध्ये रमेश देव आणि सीमा देव यांचे काही जुने फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं सांगितलं आहे की, “आई-बाबा दोघेही गेले, राहिल्या फक्त आठवणी…


आता नुकताच अजिंक्य यांनी आणखी एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आईसाठी म्हणजेच सीमा देव यांच्यासाठी एक चारोळी सादर केल्याचे बघायला मिळत आहे. “भरभरून प्रेम देऊन देखील माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही.” ही चारोळी सादर करत असल्याचे व्हिडीओ शेअर करत अजिंक्य देव यांनी कॅप्शनमध्ये फक्त आई असं लिहीलं आहे.

Rajinikanth: ‘जेलर’ यशानंतर थलायवाच्या ‘या’ नव्या सिनेमाची घोषणा

तसेच अजिंक्य देव यांच्या व्हिडीओला सध्या चाहत्यांनी भरभरून कमेंट करत असल्याचे बघायला मिळत आहे. एका नेटकऱ्यानं लिहीले आहे की, “दादा, आई-बाबा हे खरं बघता आपलं अख्ख विश्व असतं. त्यांचे हात जरी डोक्यावर असले तरी लढण्याचं बळ मिळतं. त्यांची शिकवण, संस्कार आणि आईच्या आठवणी ही तर आपल्या आयुष्यभरची खरी पुंजी असल्याचे यावेळी सांगितले आहे. दरम्यान, अजिंक्य देव आणि सीमा देव हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपल होते. १ जुलै १९६३ साली त्यांचे लग्न झाले होते. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक मराठी सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. रमेश देव यांचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर २०२३ मध्ये सीमा देव यांचे देखील निधन झाले.

Tags

follow us