Download App

Club 52 Teaser: ‘तुझ्या पिसलेल्या पत्त्यात तुझाच डाव उधळणार’, ‘क्लब 52 ‘चा धमाकेदार टीझर रिलीज

Club 52 Teaser Release: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या टीव्ही मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशीचा (Hardik Joshi) लवकरच ‘क्लब 52’ (Club 52 Movie) या मराठी सिनेमातून चाहत्यांचे मनोरंजन करायला येणार आहे. या सिनेमात अभिनेते भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

‘क्लब 52’ या मराठी सिनेमाच्या 40 सेकंदाच्या टीझरमध्ये भाऊ कदम एका क्लबमध्ये पत्ते खेळत असल्याचे दिसत आहेत. तिथेच थोड्या वेळात हार्दिकची धमाकेदार एण्ट्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिकचा एकदम रावडी लूक या सिनेमात बघायला मिळणार आहे. टीझरमध्ये काही अॅक्शन सीन्स देखील दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर टीझर पाहून भाऊ कदम आणि हार्दिकच्या हटक्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सिनेमात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या 15 डिसेंबर दिवशी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.

IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही ‘हे’ कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा…

याअगोदर हार्दिक जोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘हर हर महादेव’ या सिनेमात देखील बघायला मिळाला होता. आता तो एका नव्या आणि अनोख्या धाटणीच्या मराठी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना देखील या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us