Jitendra Joshi Post : मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता जितेंद्र जोशी (Actor Jitendra Joshi) हे नाव मनोरंजन विश्वात लोकप्रिय ठरला आहे. जितेंद्र हा उत्तम अभिनेता तर आहे, शिवाय तो संवेदनशील लेखक, कवी देखील आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेकवेळा तो कविता शेअर करत असतो. जितेंद्र जितका अभिनेता म्हणून चाहत्यांना माहिती आहे, (Jitendra Joshi Post) तसाच तो माणूस म्हणून नेमका कसा आहे, हे त्याच्या सेलिब्रिटी (celebrity) आणि मित्र-मैत्रिणींना माहिती आहे. तो एक चांगला मुलगा, पती, आणि बाप आहे, असं अनेकजण म्हणत असतात.
जितेंद्र त्याच्या लेकीच्या विषयी खूपच हळवा आहे. त्यानं अनेकदा लेकीबद्दल खास पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्यानं आणखी एक खास पोस्ट शेअर केली आहे, ती आता खूपच चर्चेत आली आहे. जितेंद्रनं एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओच्या मागची पोस्ट शेअर केली आहे. जितेंद्रनं त्याच्या लेकीचा पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रीपचा व्हिडिओ शेअर केला आहे. जितेंद्र लेकीला घेऊन लंडनला फिरायला गेला होता.
या ट्रीपमधले काही खास क्षण त्याने या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. तसंच खास कॅप्शन देखील लिहिने आहे.ती १३ महिन्यांची असताना मी तिला ट्रीपला घेऊन गेलो आणि आता तिला १३ वर्ष पूर्ण होत असताना माझ्याबरोबर तिची पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. हे शक्य झालं ते माझ्या अर्धांगिनीमुळे. मी खूप भाग्यवान आहे, कारण माझ्या बायकोने मला हे करण्यासाठी पाठिंबा दिले आहे, हा तिचा आग्रह होता.
Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…
तर इथं मी माझ्या लाडक्या मुलीबरोबर मिस्टर शेक्सपियरच्या देशामध्ये आहे. असे जितेंद्रनं त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. जितेंद्रच्या या पोस्टवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच स्पृहा जोशी, सारंग साठ्ये, स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव…अशा अनेक सेलिब्रिटींनी जितेंद्रच्या या व्हिडिओवर कमेंट् केल्या आहेत. त्यात त्याची मैत्रिण अमृता सुभाष हिने देखील कमेंट केली आहे. तिनं सांगितले आहे की, ‘ ती किती आनंदी आहे. तिला असं खूष पाहून मलाही छान वाटत आहे. तू बाप म्हणून खरचं खूप खास आहेस.