Download App

Kushal Badrike: ‘तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढले’, कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kushal Badrike: अभिनेता विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) मधून नेहमीच प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजन करणारा, कॉमेडीचं अचूक टायमिंग असलेला कुशल पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका साकारतोय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) ला ओळखले जाते. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.


कुशल बद्रिके हा ‘रावरंभा’ (Raavrambha ) या ऐतिहासिक सिनेमात नकारात्मक भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. (Marathi Movie) या ऐतिहासिक सिनेमात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखामध्ये तो झळकणार आहे. नुकतंच त्याने या सिनेमाबद्दल पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या एका संदर्भामध्ये तो चर्चेत आला आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर त्याच्या पात्राचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये त्याच्या पात्राचे काही बघायला मिळाला आहे. “स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” अगोदर कळायला हवा”, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.

त्यावर आता एका चाहत्याने कमेंट त्यांना सवाल करण्यात आला आहे. “दादा तुमचा पूर्णपणे आदर करून एक सांगतो की तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढुन गेले याची कुठेच नोंद नाही, परंतु त्यांच्या फौजेत घोरपडे नावाचे दोन भाऊ होते जे कडे चढण्यात पटाईमध्ये होते, अशी नोंद कुठेतरी सापडते पण घोरपडीला दोर लावून चढले ही दंतकथा”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर कुशलने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

“बरोबर आहे तुमचं , पण वाक्यप्रचार तसा वापरला जातो ना ! म्हणून म्हंटल”, अशा शब्दात कुशलने त्या चाहत्याला उत्तर दिली आहे. त्यावर त्या चाहत्याने कुशलला टॅग करत “नक्कीच.. आताच सिनेमा बघायला जातोय…. मराठ्यांचा इतिहास घरा घरात पोहचवण्याचं कार्य असंच तुमच्या हातून घडत रहावं, हीच त्या रायगडीच्या देवा चरणी प्रार्थना”, अशी कमेंट केली आहे. त्यावर कुशलने स्माईली आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे.

दरम्यान ‘रावरंभा’ या सिनेमात अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेमध्ये  झळकले आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारही या सिनेमात बघायला मिळत आहे.

Tags

follow us