Download App

Milind Safai Passed Away : अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Milind Safai Passed Away : अभिनेते मिलिंद सफई (Milind Safai ) यांचं आज 25 ऑगस्टला सकाळी 10.45 वाजता निधन झालं. मराठी मालिकांमध्ये वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. मिलिंद सफई यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. दरम्यान नुकतचं काल मराठीसह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना आणखी दुःखद बातमी आली आहे.

‘राष्ट्रवादीत फूटच, दोन दगडांवर पाय….; पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले

मिलिंद सफई यांची कॅन्सरशी झुंज अपयशी
मिलिंद सफई (Milind Safai ) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी झाली आहे. मिलिंद यांनी मराठी चित्रपटांसह विशेषतः मालिकांमध्ये वडीलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मराठी मालिकांचा बाप हरपला आहे. अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Balasaheb Thorat: शिर्डीनंतर नगरच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत पेच ? थोरातांनीच थेट दावा सांगितला

अनेक मालिकांमध्ये मिलिंद सफई (Milind Safai ) यांनी भूमिका साकारली आहे. तर नुकतेच ते लोकप्रिया मालिका आई कुठे काय करते? या मालिकेत देखील भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी अरूंधती या मालिकेमध्ये देखील वडीलांची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सेलिब्रेटींनी देखील शोक व्यक्त केला आहे.

मिलिंद सफई (Milind Safai ) यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, पोस्टर बॉईज, मेकअप या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या गाजलेल्या मालिकांबद्दल सांगायचे झाले तर सांग तू आहेस का? 100 डेज, पुढच पाऊल या मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होते. त्यामुळे या कलाकारांना चाहत्यांसह नेटकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज