Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; सिद्धार्थने अरेंज केली आई-बाबांची पहिली फॉरेन टूर

Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर (Social media) कायम त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीने चाहत्यांची कायम मनं जिंकत असताना बघायला मिळत असतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबद्दल सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करत माहिती दिली […]

Siddarth Jadhav

Siddarth Jadhav

Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर (Social media) कायम त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीने चाहत्यांची कायम मनं जिंकत असताना बघायला मिळत असतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबद्दल सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

सिद्धार्थची पोस्ट
सिद्धार्थनं सोशल मीडियावर त्याच्या आई-वडिलांचे फोटो शेअर करत त्या फोटोला त्यानं कॅप्शन दिले आहे की, आई बाबांचा पहिला परदेश दौरा…माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे , हे मी शब्दात नाही सांगू शकत…त्यांच्या आशीर्वादाने “मी जग बघायला फिरलो ” आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने “मी त्यांना जग बघायला पाठवतोय…” त्यातला आज त्यांचा हा “पहिला प्रवास…” माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडन ला शूटला जाईपर्यंत जी excitment , जो आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त excitment,तसाच आनंद आज मला वाटतोय….ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय.. तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको..मी आहे तुमच्यासोबत…..कायम….सिध्दू ….( #आपलासिध्दू )


Box Office Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! तीन दिवसात केली एवढी कमाई

सिद्धार्थनं शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचे बघायला मिळत आहे. अनेकांनी सिद्धार्थच्या पोस्टला कमेंट करुन त्याचं कौतुक करत आहेत. सिद्धार्थ जाधवच्या मराठी आणि हिंदी सिनेमाना चाहत्यांची कायम मोठी पसंती दिली आहे. सिद्धार्थचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची वाट पाहत असतात. सिद्धार्थन सिम्बा या सिनेमामध्ये काम केलं. तसेच त्यानं रोहित शेट्टीच्या सर्कस या सिनेमामध्ये देखील मुख्य भूमिका साकारली आहे. सिद्धार्थनं बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली आहे. सिद्धार्थचा गेल्या काही दिवसांपूर्वी ‘अफलातून’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता.

Exit mobile version