Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे अकाली निधन

Apurva Nemlekar Brother Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे त्याने अखेरचा श्वास घेतला.   View […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T175309.344

Omkar Nemlekar

Apurva Nemlekar Brother Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे त्याने अखेरचा श्वास घेतला.


अपूर्वा नेमळेकर हिने स्वतः याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही दुखःद बातमी सांगितली आहे. अपूर्वाने भावाबरोबरचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. अपूर्वा नेमळेकरने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने त्याच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्याबरोबर तिने भावूक पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

https://letsupp.com/entertainment/rekha-once-talked-about-psychical-relationship-before-marriage-35251.html

अपूर्वा नेमळेकरच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत हे कसं झालं, असा सवाल देखील तिला विचारला आहे. यावर अपूर्वाने तो २८ वर्षांचा होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातमध्ये त्याचे निधन झाले, असे कमेंट करताना सांगितले आहे. तर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Exit mobile version