Download App

Hemangi Kavi : हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आई- बाबांच्या लग्नात का नव्हतो…”

Hemangi Kavi Post: सोशल मीडियाद्वारे प्रत्येक (social media) विषयांवर आपलं मत मांडणं बऱ्याच कलाकार मंडळींना आवडतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तसेच प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडते. नुकतंच हेमांगी कवीने (Hemangi Kavi) तिच्या आई-वडिलांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.


That’s my Do Gubbare moment filled with love & happiness! 💛✨

हा आमचा Family photo!
माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी!
पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त.

लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!
मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई?
माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे!

तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो? Please Share! Use #DoGubbare

हेमांगी कवीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट (Facebook Post) शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या आई-वडिलांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिचे आई-वडील, मोठा भाऊ आणि मोठी बहिणी बघायला मिळत आहे. परंतु ती यामध्ये दिसत नाही. तिने याबद्दल तिची एक आठवणही शेअर केली आहे.

Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…

दरम्यान सध्या हेमांगी कवी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या सीरियलमध्ये झळकत आहे. या सीरियलमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत आहे. अॅड. गायत्री वर्तक असे तिच्या सिरीयलच्या पात्राचे नाव आहे. याअगोदर ती ‘लेक माझी दुर्गा’ या सीरियलमध्ये झळकली होती. यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसून आली होती.

Tags

follow us