Download App

‘श्यामची आई’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान 'श्यामची आई' या चित्रपटाने मिळवला आहे.

71 st National Film Awards : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली (National Film Awards) आहेत. यात मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान ‘श्यामची आई’ या चित्रपटाने (Shyamchi Aai Marathi Movie) मिळवला आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग मुठ्ये, मयूर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्वाच्या भू्मिका साकारल्या आहेत.

आचार्य अत्रे यांनी सन 1953 मध्ये श्यामची आई हा चित्रपट तयार केला होता. त्यावेळीही या चित्रपटाने पुरस्कार पटकावला होता. यानंतर 2023 मध्ये याच नावाच्या साहित्यकृतीवर आधारीत नवा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या कलाकृतीचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर आता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवत यशाचा मोठा टप्पा गाठला आहे.

‘12 वी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

आचार्य अत्रे यांनी सन 1953 मध्ये श्यामची आई हा चित्रपट तयार केला होता. त्यावेळीही या चित्रपटाने पुरस्कार पटकावला होता. यानंतर 2023 मध्ये याच नावाच्या साहित्यकृतीवर आधारीत नवा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या कलाकृतीचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर आता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवत यशाचा मोठा टप्पा गाठला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध कॅटेगरी निवडल्या होत्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी अभिनेता विक्रांत मेस्सीच्या नावाची घोषणा झाली. ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी विक्रांतला हा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातील विक्रांतचा अभिनय वाखाणण्यासारखा होता. या व्यतिरिक्त जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आता हा पुरस्कार विक्रांत मेस्सी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात येणार आहे. शाहरुख खानचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.

राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीच्या नावाची घोषणा झाली आहे. राणीला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सुदीप्तो सेन यांना द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. आता जाहीर करण्यात आलेले पुरस्कार 2023 साली आलेल्या चित्रपटांसाठी देण्यात येत आहेत.

मोठी बातमी! ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

follow us