Download App

शानदार… जबरदस्त… भारीच…! ‘Baipan Bhari Deva’ ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

Box Office: सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी मनोरंजनसृष्टीमधील दुसरा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा प्रदर्शित होवून जवळपास दीड महिना उलटून गेला आहे, तरी देखील चाहत्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. (Marathi Cinema ) कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजत आहेत तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत असल्याचे बघायला मिळत आहे. असं वाटतंय जणू या सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर एक उत्सवाचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.


अनेक बॉलिवूड हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले आहेत. तसेच काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असताना देखील हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आज देखील तग धरल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी मनोरंजनसृष्टीमधील दुसरा सिनेमा ठरला आहे. अनेक सिनेमाचे रेकॉर्डस् मोडत काढल्याचे बघायला मिळत आहे.

आता ७६व्या स्वातंत्र्यदिनी ‘बाईपण भारी देवा’ने ही ७६.०५ कोटी रुपयांचा आकडा पार करत मराठी सिनेमाचा विजयी झेंडा तर फडकवल्याचे दिसत आहे, आणि यासोबतच हा सिनेमा मराठी मनोरंजनसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई पोलिस या सगळ्यांनी भरभरुन केलेले कौतुक तसेच जगभरातील मायबाप चाहत्यांनी सिनेमाला दिलेल्या प्रतिसाद दिल्याने ‘बाईपण भारी देवा’ची यशस्वी घोडदौड अजून देखील तितक्याच जोराने सुरू आहे.

Box Collection: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; सहाव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला

आता तर निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकीटावर घट करून फक्त १०० रुपये केल्याने दर्शक आणखीनच नव्या जोमाने पुन्हा जावून सिनेमा पाहण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. या सिनेमाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट बघायला मिळाली आहे.

Tags

follow us