Download App

Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ नेमका कसा आहे? पाहा रिव्ह्यू…

Raavrambha Review: ‘रावरंभा’ ( Raavrambha ) हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली महापराक्रमी कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील दिग्दर्शक अनुप जगदाळेनं (Director Anup Jagdale) ‘रावरंभा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा ‘रावरंभा’ वेगळा ठरतो.

ही एक प्रेमकथा आहे. रावची म्हणजेच (ओम भुतकर) प्रेयसी रंभा यांची प्रेमकहाणी (love story) दाखवली आहे. सिनेमामध्ये रावजीच्या शूर कामगिरीबरोबरच त्याचा प्रेमळ कोपरा देखील बघायला मिळाला आहे. कथा रंजक असली, तरी मांडणीमध्ये थोडा विस्कळितपणे जाणवत आहे. काही ठिकाणी प्रसंगांची जुळवाजुळव आणि कथानकाचा प्रवास रटाळ आणि तुटक असल्याचे दिसून आला वाटतो. पटकथा ढिसाळ असल्यामुळे पूर्वार्धात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत नाही.

पण उत्तरार्धातील रंजक वळणं सिनेमात गुंतवून ठेवला आहे. कलादिग्दर्शक वासू पाटीलने मंदिर, राजवाडा, गाव आणि युद्धभूमीचा डोलारा खुबीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड किल्ल्यावरील घोडेस्वारीच्या खेळात रावजीचा चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या या पराक्रमावर खूश होऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच (शंतनू मोघे) याला सोन्याचं कड देतात आणि प्रतापराव गुजर म्हणजेच (अशोक समर्थ) यांना रावजीची अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देण्यात येतात.

त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बहलोलखान स्वराज्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देण्यात येतो. या युद्धामध्ये प्रतापरावांबरोबर रावही सोबतीला असतात. या लढाईनंतर राव आपल्या गावी परतत येतात. तिथली रंभा म्हणजेच (मोनालिसा बागल) आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशुव्यापारी जालिंदर म्हणजेच (संतोष जुवेकर) रंभावर त्याची वाकडी नजर असते. आदिलशाहीतील कुरबतखान म्हणजेच (कुशल बद्रिके) याच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

या सगळ्यामधून राव नेमकं रंभाला कसं वाचवतो, यांसह अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या सिनेमामधून बघायला मिळणार आहे. ओम भूतकर अभिनयाचा अपेक्षित असा ठसा उमटवू शकला नाही. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये अशोक समर्थ यांचा अभिनय चौकटीतला असल्याचे दिसून आले आहे. शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला चपखल बसला आहे.

मोनालिसा बागलने देखील रंभा ही भूमिका आत्मविश्वासाने निभावली असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक भाव खाऊन जातो, तो संतोष जुवेकर. संजय जाधवच्या छायांकनामुळे सिनेमा विशिष्ट एक आकार घेतला आहे, तसेच आदर्श शिंदे, अमितराज, आनंदी जोशी, आदित्य बेडेकर यांचा सांगीतिक साज सिनेमाला उजाळा मिळाला आहे. पौर्णिमा ओक यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले आहे, एकंदरीत हा सिनेमा एकदा बघण्यासाठी रंजक आहे.

Tags

follow us