Download App

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Raavrambha Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक सिनेमाचा भरणा बघायला मिळणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ मोठ्या पडद्यावर चितारण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढी देखील बघायला मिळत आहे. या सगळ्याच्या दरम्यान कथानकाची तोडमोड, कलाकारांची अयोग्य निवड यामुळे असे काही सिनेमा वादांत देखील अडकतात.


मात्र ‘रावरंभा’ या मराठी सिनेमात ऐतिहासिक बाजू सांभाळत एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ‘रावरंभा’ हा सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा चित्रपट बघून आलेल्या दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून ‘रावरंभा’ या सिनेमाचे कौतुक केले आहे. महेश टिळेकर यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘डोळ्यात आणि ह्रदयात साठवावा ‘रावरंभा’.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतचाहत्यांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले आहेत. पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच ‘रावरंभा’ सिनेमा चाहत्यांना दिसून येणार आहे.

https://letsupp.com/entertainment/movie-review-manoj-bajpayee-sirf-ek-banda-kafi-hai-movie-review-50640.html

या सिनेमामध्ये मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहणार असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची चढाओढ एकदम जबरदस्त आहे. युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणणारा आहे. शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेमध्ये नेहमीप्रमाणे जान आणतो. नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की, नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांना देखील चांगल्या प्रकारे साथ दिली आहे.

Gautami Patil : पाटील हेच आडनाव लावणार, मराठा संघटनेला गौतमीचं सडेतोड उत्तर

या सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच, पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे, हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे… मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास ‘रावरंभा’ अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील’, असे महंत महेश टिळेकर यांनी सिनेमाचे कौतुक केले आहे.

Tags

follow us