Download App

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर

Sindhutai Mazi Mai: मराठी मालिका विश्वात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा, यशोगाथा आपल्याला पहायला मिळत असतात. यांमध्ये आता दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्याही चिंधीची गोष्ट छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. तसेच अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माईंची सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई आहेत. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. माईंनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे.


आता सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावर एका सिरीयलच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येणार आहे. “सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी सिरीयल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिरियलची प्रोमो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या सिरीयलच्या प्रोमोमध्ये सिंधुताई आणि चिंधी म्हणजेच बालपणीच्या सिंधुताई यांच्यामधील संवाद दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.


या प्रोमोला कॅप्शन देखील देण्यात आलं, अडथळ्यांची शर्यत चिंधीने प्रेमाने जिंकली, अनाथ लेकरांची आई ‘सिंधुताई’ झाली..पाहा, नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची”, 15 ऑगस्टपासून संध्या. 7.00 वा’ असे लिहण्यात आले आहे.

तसेच गेल्या काही दिवसापासून “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या सिरियलची आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला देखील ‘मातृत्वाचा झरा बनून झाली ती लाखो अनाथ लेकरांची आई..पाहा, नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची”. असे कॅप्शन देण्यात आले आहे. या प्रोमोला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या सीरियलमध्ये कोणती अभिनेत्री सिंधुताई यांची भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमामध्ये सिंधुताई यांचा प्रवास दाखवण्यात आला होता. या सिनेमात तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सिंधुताई यांची भूमिका साकारली होती. आता “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या सिरीयलच्या माध्यमातून सिंधुताई यांच्या बालपणाची गोष्ट बघण्यास चाहते खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us