MasterChef India Winner : ‘मास्टरशेफ इंडिया 7’चा (Masterchef India 7) विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. (Masterchef India) नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) या पर्वाचा विजेता ठरला आहे.
मास्टरशेफ इंडियाच्या ग्रँड फिनालेला अनुभवी शेफ संजीव कपूर यांच्यासह शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा उपस्थित होते. त्यांनी शोच्या ३ फायनलिस्टना “सिग्नेचर थ्री-कोर्स मील” चे चॅलेंज देण्यात आले होते. ३ महिन्यांचा प्रवास आणि फायनल कोर्स मीलचे चॅलेंज पूर्ण करून नयनज्योती पर्वाचा विजेता ठरला आहे.
बक्षीस म्हणून नेमकं काय?
नयनज्योतीला बक्षीस म्हणून २५ लाख रुपयांचा चेक, ‘मास्टरशेफ इंडिया’ची मोठी ट्रॉफी तसेच गोल्डन शेफचा कोट नयनज्योतीला देण्यात आला आहे. आसाममधील सांता सर्मा या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. या दोघींनाही प्रत्येकी ५ लाखांचे चेक आणि मेडल देण्यात आले आहे.
माझं एक साधं स्वप्न होतं आणि ते म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’मध्ये जाऊन स्वयंपाक करायचं, पण आता मला वाटतं की आयुष्यात माझी सर्व ध्येये पूर्ण झाली आहेत. मी फक्त मास्टरशेफमध्ये गेलो नाही, तर मला अॅप्रन देखील मिळाले. एवढी मोठी कुकिंग स्पर्धा जिंकणं मला अशक्य असल्याचे वाटत होतं. माझ्या मनात स्वतःविषयीची शंका होती.
परंतु परीक्षकांनी मला खूप प्रेरित केले, विशेषत: शेफ विकास ज्यांनी ऑडिशनच्या दिवसापासून मला शेवटच्या क्षणापर्यंत खूप मदत केली आहे. ‘मास्टरशेफ इंडिया 7’च्या अंतिम टप्यात कमलदीप कौर, अरुणा विजय, प्रियंका कुंडी बिस्वास, सचिन खटवानी, गुपकीरत सिंह, सुवर्णा बागुल, संता सरमाह आणि नयन ज्योती हे आठ स्पर्धक पोहोचले होते.