Paiwatachi Sawli Release Date: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. (Paiwatachi Sawli) चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. (Marathi Movie) अश्या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. (Paiwatachi Sawli Movie) या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारा आहे. ‘पायवाटाची सावली’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे.
जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान लोकांना फार आकर्षित करेल. ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत बॉलिवूड मधील महान संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे.
या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते करत आहेत. लेखक – दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “मी या आधी 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. एक हिंदी चित्रपट लाखो है यहा दिलवाले व निवडूंग, गाव पुढे आहे, उडत गेला हे 3 मराठी चित्रपट.
Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ ची भुरळ
‘पायवाटाची सावली’ हा माझा 5 वा चित्रपट आहे. चमत्कार कसे होतात? देव आहे की नाही? हे प्रश्न मला पडायचे यातूनच मला पायवाटाची सावली या चित्रपटाचं कथानक सुचल. हा चित्रपट आशयघन असून एका लेखकाचा प्रवास उलगडणार आहे. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यात हरतो तेव्हा त्याच्यावर काय परिस्थिती ओढवते पण जेव्हा तो यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याचा प्रवास कसा उलगडतो याच जिवंत उदाहरण यात दर्शविले आहे. आम्ही हा चित्रपट १३ सप्टेंबरला तुमच्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात घेऊन येत आहोत.”