Download App

कतरिना आणि विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमसचा’ ट्रेलर रिलीज, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

  • Written By: Last Updated:

Merry Christmas Film : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमस (Merry Christmas)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, आता चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलली आहे.

मल्लिकार्जून खर्गे PM फेस? ममतांच्या खेळीने नितीश कुमार, राहुल गांधींचा ‘गेम’ 

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार बदलली जात आहे. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कतरिना आणि विजयचा ‘मेरी क्रिसम’ हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार होता. मात्र, आता या चित्रटाच्या रिलीजची डेट पुढं ढकलली आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

काल अनोख्या पद्धतीने ट्रेलर रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, आमचा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होण्यासाठी तयार होता. मात्र, स्क्रीनवर गर्दी असल्याने आम्ही तो दोन आठवड्यांनंतर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्याकडे कुणीही CM होऊ शकतो; फडणवीसांनी स्वतःचं केला ‘सेल्फ’ गोल 

ट्रेलरमध्ये काय?
या ट्रेलरच्या सुरुवातीला कतरिना आणि विजय सेतुपती यांची भेट दाखवण्यात आली आहे. त्यानंतर कतरिना आणि विजय एकमेकांशी फ्लर्ट करतात. नंतर ट्रेलरमध्ये, कतरिना विजयला तिच्यासोबत ख्रिसमस साजरा करण्याची ऑफर देते आणि नंतर हळूहळू कथा थ्रिलरमध्ये बदलते. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा लिपलॉक किसिंग सीनही ट्रेलरमध्ये दिसत आहे. या दृश्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, हा चित्रपटात उत्कंठावर्धक कथा आणि क्राईम रोमान्स अनुभवायला मिळणार असल्याचं दिसतं. या ट्रेलरने प्रेक्षकांना आता चित्रपटाची वाट पाहायला लावलं आहे.

मेरी ख्रिसमस हा चित्रपट हिंदी आणि तमिळ व्हर्जनमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांच्याशिवाय या चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत. तसेच राधिका सरथकुमार, षणमुगराजा, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काही दिवसांपूर्वीच कतरिनाचा ‘टायगर 3’ रिलीज झाला होता. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत काम केले होते. तर विजय सेतूपती हा शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता कतरिना आणि विजय मेरी ख्रिसमस या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी, ​​जया तौरानी, ​​केवल गर्ग आणि संजय रौट्री यांनी केली आहे. श्रीराम राघवन यांनी याचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Tags

follow us