Mika Singh Health Update: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंग गेल्या काही दिवसापासून आजारी आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो परदेशात अडकला आहे. मिका सिंगने (Mika Singh) सांगितले आहे की, त्याला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे, तो कॉन्सर्टमध्ये देखील परफॉर्म करू शकणार नाही. (Mika Singh Health) यामुळे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा खुलासा मिका सिंगने यावेळी केला आहे.
आपल्या चुकांमुळे हे सर्व भोगावे लागत असल्याचे त्याने मान्य केले आहे. त्यांनी शरीराला विश्रांती देत नसल्याने आणि त्यांची प्रकृती व घसा कायम खराब होत गेल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले आहे. एका दिलेल्या मुलाखतीमध्ये मिका सिंगने त्याच्या प्रकृती अस्वस्थाबद्दल यावेळी सांगितले आहे. तो म्हणाला आहे की, ‘माझ्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हे पहिल्यांदा घडले असल्याचे सांगितले आहे. माझी तब्येत खराब असल्याने, मला माझे शो पुढे ढकलावे लागत आहेत. जेव्हा माझ्या आरोग्याचा सवाल येतो, त्यावेळेस मी नेहमीच काळजी घेतली आहे.
परंतु मी अमेरिकेत ‘बॅक टू बॅक शो केले. अजिबात आराम केला नाही. याचा परिणाम असा झाला की माझी तब्येत बिघडत गेली. ४६ वर्षीय मिका सिंगने आजून एक खुलासा केला आहे की, तो यूएसए मध्ये परफॉर्म करत असताना, त्या काळात त्याला थंडी आणि ताप आला होता. त्याचा घशावर देखील मोठा परिणाम झाला. डॉक्टरांनी मिकाला प्रवास आणि शो बंद करण्यास सांगितले हाेते. पुढील शोसाठी तो २५ तासांचा प्रवास करू शकत नव्हता. तसेच ऑस्ट्रेलियाला किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाऊ शकत नाही.
Girish Oak Post: अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
तसेच मिका सिंगला देशात परत देखील येता येत नाहीय. त्याची तब्येत बिघडल्यामुळे अनेक शो देखील त्याला रामराम करावा लागला आहे. मिका सध्या प्रदेश दौऱ्यावर होता, काही देशांमध्ये त्याचे अनेक कॉन्सर्ट होणार होते. अशा परिस्थितीत मिका सिंगने सांगितले आहे की, त्याचे १० ते १५ कोटींचे नुकसान झाले आहे. शोमध्ये परफॉर्म न केल्याने त्याला अनेकांचे पैसे देखील परत करावे लागल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. तसेच तो पुढे म्हणाला की, ‘काही लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि सीडी आणि लिप सिंकच्या माध्यमातून मला गाण्याची परवानगी देण्यात आली.
आजपर्यंत केलेली मेहनत, प्रतिमा, स्वागत सर्वच वाया जाणार का अशा पेंशन त्याला यावेळी पडला आहे. परंतु आता त्याची प्रकृती अगोदरपेक्षा उत्तम असल्याचे देखील त्याने स्पष्ट केले आहे. आता तो बरा होत आहे. या आठवड्यापासून तो रेकॉर्डिंग वगैरे सुरू करणार आहे. लवकरच त्याचे परफॉर्मन्स बाली, सिंगापूर, मलेशिया, जकार्ता आणि इतर अनेक देशांमध्ये होणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.