Download App

‘Wahi Toh Khuda Hai’ मध्ये पहिल्यांदाच एकत्र आले मिथून आणि अरमान

Mithoon & Armaan Malik collaborate first single together : प्रसिद्ध संगीतकार-गायक मिथून आणि तरूणांचं आकर्षण ठरलेला अरमान मलिक या दोघांनी भूषण कुमार निर्मित ‘वही तो खुदा है’ या गाण्यामध्ये पहिल्यांदाच एकत्र गायले आहे. ‘वही तो खुदा है’ हे गाणं ऐक मानुसकी आणि सद्भावना दाखवणारं गाणं आहे. या गाण्याचा व्हिडीओ देखील मिथून आणि अरमान मलिक या दोघांवरच चित्रित करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच हे गाणं येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी हे गाणं एक रोमॅंटीक गाणं असेल असं सांगण्यात येत होत. पण रिलीज झाल्यानंतर हे गाणं एक मानुसकी आणि सद्भावना दाखवणारं गाणं आहे. हे स्पष्ट झालं आहे. हे गाणं मिथून आणि अरमान मलिक या दोघांनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांपेक्षा अत्यंत वेगळे आहे. त्यामुळे हे गाणं खास आहे.

The Kerala Story: ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात 32 हजार मुलींना बनवलं कैदी; अंगावर काटा आणणारा ट्रेलर

टी- सिरिजच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना मिथून म्हणाला, ‘प्रेक्षकांनी आमच्याकडून अशी आपेक्षा केली नसेल पण आम्हाला हे गाणं गाताना खूप आनंद झाला. जगामध्ये मानुसकी आणि सद्भावना असंणे गरजेचे आहे. यागाण्यातून लोकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असं मला वाटतं.’

तर या गाण्याबद्दल बोलताना अरमान मलिक म्हणाला, मी पहिल्यांदाच मिथूनसोबत गाणं गायलं. मला खूप आनंद झाला. आम्ही या आधी वेगळ्या प्रकारचे गाणे गायले आहेत. या गाण्यामुळे आम्हाला नवीन काही तरी गाण्याची संधी मिळाली. अशा प्रतिक्रिया या गाण्यावर मिथून आणि अरमान मलिक या दोघांनी दिल्या आहेत.

Tags

follow us