Ameya Khopkar यांनी पाकिस्तानी कलाकार अन् निर्मात्यांना दिला दम; म्हणाले, तंगड्या तोडून…

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार आणि निर्मात्यांना चांगलाच दम दिला आहे. नुकतेच अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची (Tweet) चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे. भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही […]

Ameya Khopkar

Ameya Khopkar

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार आणि निर्मात्यांना चांगलाच दम दिला आहे. नुकतेच अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची (Tweet) चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे.

अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.’

अमेय खोपकर यांच्या या ट्वीटला काही नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. अमेय खोपकर हे अनेकवेळा ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर जोरदार हल्लाबोल करत असतात. मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि निर्मात्याविरोधात नेहमीच खोचक टीका करत असतात. ‘बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येत असल्याने पुन्हा एकदा आम्ही कठोर शब्दात इशारा देत आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

तसेच फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागणार आहेत, आणि त्यांच्या तंगड्या तोडू, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. तसेच ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाचा कडकडून विरोध देखील अमेय खोपकर यांनी केला होता. ‘नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स आहेत, त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा पाहावा’ असं ट्वीट अमेय खोपकर यांनी अगोदर एकदा केले होते. माहिरा खान,वीना मलिक, सबा कमर या पाकिस्तानी अभिनेत्रींनी हिंदी सिनेमासृष्टीत काम केले आहेत. तसेच अली जफर पाकिस्तानी अभिनेत्याने देखील बॉलिवूडमध्ये काम केले आहे. तसेच अमेय खोपकऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे आता सिनेसृष्टीतून काय प्रतिक्रिया येणार आहेत, हे बघावं लागणार आहे.

Exit mobile version