Movie On India’s Most Fearless 3 : 2020 साली भारत आणि चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. गलवानमध्ये हॅंड-टू-हॅंड कॉम्बेटमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तसेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरच्या यांग्त्सेमध्ये चीन आणि भारतीय सैन्यात चकमक झाली होती. यावर ज्येष्ठ पत्रकार शिव अरूर आणि इंडिया टुडे टीवी के वरिष्ठ कार्यकारी संपादक और हिंदुस्तान टाइम्स के वरिष्ठ संपादक राहुल सिंह यांनी ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस 3’ हे पुस्तक लिहिले आहे.
आता या पुस्तकातील एका भागावर चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी पुस्तकाच्या त्या भागाचे हक्क लेखकांकडून मिळवले आहेत. या पुस्तकाचे दोन्ही लेखक हे सैन्याच्या संबंधित पत्रकारितेसाठी प्रसिद्ध आहेत.
भारताशी दोन हात करण्याची आमची कुवतच नाही; पाकच्या लष्करप्रमुखांची कबुली
या दोन्ही लेखकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘गलवान घटना एक अशी घटना आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्याचं नुकसान झालं. परकीय आक्रमणाचा हा घाव त्रासदायक आहे. आम्ही मांडलेला या घटनेच्या लेखा-जोखावर आता चित्रपट योणार आहे.
दिग्दर्शक अपूर्व लखिया म्हणाले की, माझ्यासाठी हा सन्मान आहे की, ज्येष्ठ पत्रकार शिव अरूर आणि इंडिया टुडे टीवी के वरिष्ठ कार्यकारी संपादक और हिंदुस्तान टाइम्स के वरिष्ठ संपादक राहुल सिंह यांनी त्यांच्या पुस्तकावर चित्रपट तयार करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला आहे.
