Download App

Shahrukh Khan : पठाणमुळे बंद पडलेल्या चित्रपटगृहांना मिळणार संजीवनी

मुंबई : कोरोनामुळे बंद पडलेल्या चित्रपटगृहांना अभिनेता शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. कारण पठाणची मोठ्या प्रमाणात अॅडव्हॅन्स बुकींग करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या पोस्टर पासून ट्रेलरपर्यंत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता कोरोनामुळे बंद पडलेले चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. तर पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.

पुन्हा सुरू होणारे चित्रपटगृह :

1) कोहिनूर सिनेमा, सुरतगड, राजस्थान.
२) जेम सिनेमा, जयपूर, राजस्थान.
३) गीता टॉकीज, हिंडौन, राजस्थान.
4) संगम सिनेमा, खंडेला, राजस्थान.
5) ड्रीमलाइट सिनेमा, सुजानगढ, राजस्थान.
6) प्रकाश टॉकीज, नवलगढ, राजस्थान.
7) जेआरसी मूव्ही पॅलेस, फतेहपूर, राजस्थान.
8) ज्योती सिनेमा, इंदूर, मध्य प्रदेश.
९) कार्निवल आर मॉल, मुलुंड, मुंबई.
10) सिनेकमला फोंडा, गोवा.
11) प्रभात टॉकीज, गोंदिया, महाराष्ट्र.
12) लाजवंती टॉकीज, बिश्रामपूर, छत्तीसगड.
13) प्रभात टॉकीज, बिना, मध्य प्रदेश.
14) SGL हेरिटेज सिनेमा, अल्मोरा, उत्तराखंड.
15) ज्ञान सिनेमा, महमुदाबाद, उत्तर प्रदेश.
16) कार्निवल TGIP सिनेमा, नोएडा, उत्तर प्रदेश.
17) पीडीआर सिनेमा, वाराणसी, उत्तर प्रदेश.
18) एम सिनेमा, बिंदकी, उत्तर प्रदेश.
19) कविता सिनेमा, लोणी, उत्तर प्रदेश.
20) रामा सिनेमा, जौनपूर, उत्तर प्रदेश.
21) सिनेशाइन सिनेमा, छिब्रामाऊ, उत्तर प्रदेश.
22) जे.सी. पॅलेस सिनेमा, बदाऊन, उत्तर प्रदेश.
23) कपिल सिनेमा, मवाना, उत्तर प्रदेश.
24) मधुवन सिनेमा, डासना, उत्तर प्रदेश.
25) राजकरण सिनेमा, अलाहाबाद, उत्तर प्रदेश

10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जेमतेम काही दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मद्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us