Download App

Zara Hatke Zara Bachke: सामान्य लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवणारा ‘जरा हटके जरा बचके’!

Zara Hatke Zara Bachke: गेल्या काही दिवसामध्ये अनेक कथानकावर भाष्य करणारे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमांतील नव्या गोड्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवीकोरी जोडी चाहत्यांना भेटीला आली आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेमध्ये आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निर्माते दिनेश विजान छोट्या शहरांतील मध्यमवर्गीयांची गोष्ट चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. आता ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाच्या माध्यमातून ते अशीच एक भन्नाट गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाची गोष्ट इंदूरमध्ये राहणाऱ्या कपिल दुबे (विकी कौशल) आणि सौम्या दुबेची (सारा अली खान) आहे. सौम्या आपल्या आई-वडिलांसोबत एका छोट्या खेड्यातील छोट्या घरात लहानाची मोठी झालेली मुलगी आहे. एका कोचिंक क्लासमध्ये ती विद्यार्थ्यांना शिकवते. तर दुसरीकडे कपिल योगा शिकव असतो. तसेच कपिल आणि सौम्या पती-पत्नी असून अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे आहे.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

एका छोट्या घरात त्यांनी त्यांच्या संसाराची सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांच्या घरी कपिलचे मामा-मामी येत असतात. आता घरात अचानक पाहुणे आल्यामुळे नव्या जोडप्याला एकत्र वेळ घालवणं अशक्य होत आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमातील गाणी देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी आहेत. गाण्यांबरोबर सिनेमाचं कथानक पुढे सरकत असल्याचे दिसून येतं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबियांची गोष्ट योग्यपद्धतीने मांडणारा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा महत्वाचा ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Tags

follow us