Download App

Lets Get Married Trailer: कॉमेडी, ड्रामा अन् सस्पेंस, माहीच्या ‘लेट्स गेट मॅरिड’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

  • Written By: Last Updated:

Lets Get Married Trailer : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) म्हणजेच माहीने आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज केला आहे. माहीने दाक्षिणात्य सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या लाँचिंगसाठी माही (Mahi) आज चेन्नईला आल्याची माहिती समोर आली आहे. माहीने चेन्नईमध्ये आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून या सिनेमाची माहिती दिली आहे. माही सध्या एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत या धमाकेदार सिनेमाची निर्मिती केली आहे.


जानेवारी २०२३ मध्ये या सिनेमाची घोषणा केली होती. आज माहीने या सिनेमाचा ट्रेलर रिलिज केला आहे. ‘धोनी एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. ‘एलजीएम : लेट्स गेट मॅरिड’ (Lets Get Married) असं या सिनेमाचे नाव आहे. ‘लेट्स गेट मॅरिड’ हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘धोनी एन्टरटेनमेंट’ने सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. परंतु या सिनेमामध्ये कोणते कलाकार झळकणार? याची देखील जोरदार चर्चा रंगत आहे.

हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार ‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत. या सिनेमात इवाना ही मुख्य भूमिकेतमध्ये दिसून येणार आहे. ‘लव्ह टुडे’ या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तसेच बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलंच सुपरहिट ठरला होता.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

या सिनेमाचे मोशन पोस्टर अॅनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. माही सध्या आपल्या दुसऱ्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे. हा कॉमेडी ड्रामा सिनेमा असणार आहे. यामध्ये एक कपल आणि आई यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. माहीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात २५ जानेवारी २०१९ मध्ये करण्यात आली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत ३ शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ‘रोर ऑफ द लॉइन’, ‘बिलेज टु ग्लोरी’ आणि ‘द हिडन हिंदू’ यासारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसून येत आहे. माहीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क करणार आहे.

Tags

follow us